नॅनोपेक्षा छोटी ‘बजाज क्यूट’ कार येणार बाजारात

नॅनोपेक्षा छोटी ‘बजाज क्यूट’ कार येणार बाजारात

नॅनोपेक्षा आकारांनी छोटी 'बजाज क्यूट' कार येणार बाजारात

भारतीय बाजारात नवनवीन गाड्या या येत असतात. काही वर्षांपूर्वी बाजारात नॅनो नावाची कार आली होती. जेव्हा नॅनो कारची घोषणा झाली होती त्यावेळी मध्यमवर्गीयांनी त्या गाडीला ओसंडून प्रतिसाद दिला होता. नॅनो कार ही फक्त एक लाख किमतीची कार होती. त्यामुळे कमी किंमत असल्याकारणाने अनेकांनी आपले कार घेण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मात्र, आता भारतीय बाजारात नॅनोपेक्षा छोटी कार येणार आहे. बजाज कंपनीने ‘बजाज क्यूट’ कार ही लाँच केली आहे. आतापर्यंत ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जात होती. आता ‘बजाज क्यूट’ कार भारतातही धावताना दिसणार आहे.

लवकरच भारतीय बाजारात

बजाज कंपनीने बनवलेली ‘बजाज क्यूट’ कार २०१२ मध्ये परदेशात लाँच केली होते. भारतात ही कार २०१२ मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ठेवण्यात आली होती. तसेच नेहमीच्या वापरासाठी २०१६ मध्ये ती काढण्यात आली होती. मात्र, वापरात काढूनही वाहतुकीच्या नियमांमुळे ‘बजाज क्यूट’ कार वापरण्यास परवानगी नव्हती. पण आता ही कार लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

क्यूट कारचे वेगळेपण

‘बजाज क्यूट’ कारमध्ये २१६ सीसी, सिंगल सिलेंटर, वॉटर कोल्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. तसेच ‘बजाज क्यूट’ कारला मोटरसायकल सारखे ५ गिअर आहेत. तसेच या कारमध्ये एलपीजी आणि सीएनजी गॅसचा पर्यायही दिला आहे. ही कार ७० किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. तर ३५ किलोमीटर मायलेज आहे. या कारचा आकार टाटाच्या नॅनो कारपेक्षा छोटा असून लवकरच बाजारात लाँच होणार आहे. ‘बजाज क्यूट’च्या सीएनजी मॉडेलची किंमत २.८४ लाख इतकी आहे. तर पेट्रोल मॉडेलची किंमत २.६४ लाख इतकी असणार आहे.

First Published on: April 16, 2019 4:07 PM
Exit mobile version