सावधान! Vodafone-Idea, Airtel युझर्स चुकूनही करु नका ‘या’ मेसेजवर क्लिक अन्यथा…

सावधान! Vodafone-Idea, Airtel युझर्स चुकूनही करु नका ‘या’ मेसेजवर क्लिक अन्यथा…

भारतात आता प्रत्येक व्यक्ती डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. याचा महत्वपुर्ण फायदा नारिकांना होत आहे. पण एका नाण्याच्या जश्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या नव्या तंत्रज्ञानाच्या चांगल्या वाईट अशा दोनही परिणामांचा सामना लोकांना करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून Vodafone-Idea आणि Airtel युझर्संना KYC अपडेट करण्यासंबधीत मेसेज येत आहेत. जर युझर्संनी पुढील 24 तासात KYC अपडेट केला नाही तर तुमचा सिमकार्ड बंद होईल अशी माहिती  मेसेजद्वारे लोकांना देण्यात येत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर वेळीच सावधानता बाळगत चुकूनही या मेसेजला क्लिक करु नका. कारण या मेसेजद्वारे तुमच्या मोबाईलमधील महत्वपुर्ण माहिती चोरण्यात येत आहे. अशा मेसेजला किंवा त्यावर देण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका. या मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

Vodafone-Idea आणि Airtel कंपनीतर्फे सध्या ग्राहकांना एक अलर्ट मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये ग्राहकांना सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभरात सायबर गुन्हेगारीचे जाळे पसरले आहे. लोकांची फसवणूक करून त्यांच्या बँक मधील पैसे लुबाडण्यात येतात.

ग्राहकांना फोन करुन किंवा मेसेज पाठवून गुगल प्ले स्टोरवरुन एक क्विक सपोर्ट ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. पण असा कोणताच ॲप नसल्याने ग्राहकांना Team Viewer Quik suppor या ॲपवर रिडारेक्ट करण्यात येते. या ॲपद्वारे हॅकर्संना फोन किंवा फोनशी संबधित अकांउट्सचा ॲक्सेस मिळतो. यानंतर फोन स्क्रिनवरील सर्व माहिती हॅकर्सना दिसते यानंतर ग्राहकांच्या खाजगी तसेच फायनाशियल डिटेल्स त्यांना सहजरित्या उपलब्ध होते.

संबधीत मेसेज किंवा कॉल आल्यास तात्काळ तो डिलीट करा. तसेच कोणत्याही अनोळखी ॲप मोबाईलमध्ये अचानक डाऊनलोड झाल्यास मोबाईल रिफ्रेश करा. कोणालाही फोनवर OTP किंवा KYC नंबर शेअर करु नका. अशा मेसेज पासून सावधान राहा अन्यथा तुमचे बॅंक खाते रिकामे होऊ शकते


हे हि वाचा – Alert! २७ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये G-Mail, YouTube सह Google अकाऊंट सपोर्ट करणार नाही!

First Published on: August 2, 2021 4:00 PM
Exit mobile version