फोन चोरीला गेला तरी नो-टेन्शन; एका क्लिकवर होणार डेटा ब्लॉक

फोन चोरीला गेला तरी नो-टेन्शन; एका क्लिकवर होणार डेटा ब्लॉक

वाढत्या लोकसंख्येमुळे घराबाहेर प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाल्याने चोरीचे प्रकार देखील वाढताना दिसत आहे. यापुर्वी फोन चोरी झाल्यास पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती त्यानंतर तुमच्या फोनमधल्या खाजगी बाबी ब्लॉक केल्या जात होत्या. मात्र आता सरकारने असे वेबपोर्टल तयार केले आहे की, त्याचा वापर करून एका क्लिकवर तुमचा सर्व डेटा ब्लॉक होऊ शकतो, अशी माहिती सरकाच्या दूरसंचार विभागाकडून देण्यात आली आहे.

या मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाने CEIR म्हणजे इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. याचा वापर करून तुमच्या फोन नंबरवर तुमचा डेटा ब्लॉक करण्यास मदत होऊ शकते. फोन चोरी झाल्यानंतर या वेब पोर्टलवर तुमच्या फोनचा IMEI नंबर टाकून डेटा ब्लॉक करून टेलिकॉम ऑपरेटर किंवा राज्यातील पोलिसांनाही याबाबत माहिती दिली जाऊ शकते. तसेच IMEI क्रमांक टाकल्यानंतर सरकार तुमचा वेबसाईट ब्लॉक करू शकतो.

असा करता येणार एका क्लिकवर डेटा ब्लॉक

१. चोरी झालेला मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल,.

२. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला ब्लॉकचा पर्याय दिसेल. यात मोबाईल चोरीला गेला आहे की हरवला आहे, यावर एक बटन दाबून उत्तर द्यावे लागेल.

३. त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक फॉर्म येईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर, IMEI 1/IMEI 2, फोनच्या कंपनीचे नाव, चोरी झालेल्या फोनचा तपशील टाकावा लागणार आहे.

४. सर्व माहिती टाकल्यानंतर सर्वात शेवटी एक अंतिम बॉक्स दिसेल.

First Published on: September 30, 2019 2:51 PM
Exit mobile version