फेसबुक मॅसेंजरमध्ये तात्काळ बिघाड, चुक लक्षात आल्यावर केली दुरुस्त

फेसबुक मॅसेंजरमध्ये तात्काळ बिघाड, चुक लक्षात आल्यावर केली दुरुस्त

प्रातिनिधिक फोटो

फेसबुकने बनवलेले मॅसेंजर अॅपच्या कमतरतेचा फायदा इतर वेबसाइट्स घेतात आहे. या वेबसाइट्स फेसबुकचा वापर करून युजर्सची खासगी माहिती जमा करतात. फेसबुकचे जगभारात १३० कोटी युजर्स आहेत. सोशल मीडियामध्ये फेसबुक एक अग्रेसर कंपनी आहे. युजर्सची माहिती कोणालाही पोहचू शकणार नाही असा दावा फेसबुक नेहेमीच करत आले आहे. मात्र काही अतीउत्साही हॅकर्स फेसबुकला विविध पद्धतीने हॅक करण्याचा प्रयत्न करतात. फेसबुकवरून डाटा लिक झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी अधिक काळजी घेण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र फेसबुकच्या मॅसेंजरच्या सुरक्षीततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यावेळी फेसबुक युजर्सची माहिती नाही तर खासगी मॅसेज हॅक करण्यात येण्याची शक्यता होती.

काय आहे प्रकरण

एका तज्ज्ञांने कार्यक्रमादरम्यान फेसबुक मॅसेंजरवरील चुक लक्षात आणून दिली. यानंतर फेसबुकने याची गंभीर दखल घेतली. नोव्हेंबर २०१७ मध्ये मसास आणि त्यांच्या कंपनीने मॅसेंजर अॅप सुरु केले होते. या अॅला फेसबुकशी जोडण्यात आले होते. या अॅपला युजर्स वेब ब्राउझरवर चॅनेल अटॅकच्या नावानेही ओळखले जाते. मात्र या मॅसेंजरला हॅक करण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता. मॅसेंजरला हॅक केल्यामुळे युजर्समधील खासगी संवाद हॅकर्स वाचू शकतात.

First Published on: March 8, 2019 8:36 PM
Exit mobile version