चीन करणार समुद्रातील बदलांचा अभ्यास

चीन करणार समुद्रातील बदलांचा अभ्यास

फोटो प्रातिनिधीक आहे.

अंतराळ संशोधनात चीन देखील मागे नाही. आता चीन समुद्रातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी चीनचे मरीन सॅटेलाईट अवकाशात सोडण्यात आले असून या उपग्रहाच्या मदतीने समुद्रातील बदलांचा अभ्यास केला जाणार आहे. या शिवाय त्सुनामी आणि वादळाची पूर्वकल्पना मिळण्यास मदत होणार आहे.

काय आहे हे चीनचे मिशन

मार्च 2c हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले असून त्यात HY-1C नावाचा उपग्रह होता. शुक्रवारी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी या हे रॉकेट अवकाशात झेपावले. चीनच्याा तैवान येथील अंतराळ केंद्रातून यानाने उड्डाण केले. या उपग्रहाच्या माध्यमातून समुद्रातील बदलांचा अभ्यास केला जाणार आहे. जगभरातील समुद्रात होणारे बदल, जीवसृष्टी आणि समुद्रातील वनस्पती यांचा अभ्यास यात केला जाणार, असे चीनकडून सांगण्यात आले आहे.

धोक्याची देणार पूर्वसूचना

चीनच्या किनारपट्टीवरील जलसंसाधन, द्वीपसमूह, किनारपट्टीचा भाग आणि समुद्रातील दुर्घटनांचा अभ्यास देखील केला जाणार आहे. यानाने दिलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपाययोजना करणे देखील सोपे जाणार आहे, असे देखील चीनकडून सांगण्यात आले आहे.

चीनचे मरिन सॅटेलाईट (फोटो प्रातिनिधीक आहे.)

समुद्रातील वातावरण अभ्यासणार

समुद्राच्या पाण्याचा बदलता रंग, त्यातील बदलते तापमान, माशांच्या प्रजननावर होणारा परिणाम, माशांची संख्या हे सगळे समुद्रातील बदल या मोहिमेच्या माध्यमातून टिपले जाणार आहेत. या बदलानुसार उपाययोजना देखील केल्या जाणार असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे.

याआधीही चीनने केला होता अभ्यास

समुद्राचा अभ्यास करणारे चीनचे पहिले मिशन नाही. याआधी मे २००२ मध्ये चीनने HY-1A हे यान अंतराळात सोडले होते. त्यानंतर २००७ साली HY-1B हे अंतराळात सोडले होते. त्यानंतर आता २०१९ मध्ये ही मोहीम चीनकडून राबवण्यात आली आहे.

First Published on: September 12, 2018 1:47 PM
Exit mobile version