KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खाते साफ

KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खाते साफ

KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खात साफ

बँकेचे सर्व व्यवहार गेल्या काही काळापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. KYC अपडेट प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुरु आहे. मात्र या KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खाते रिकामी करण्याचे काम सुरू आहे. KYC अपडेट करणार असल्याचे सांगत फ्रॉड झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. (Customer fraud under Online KYC Updation SBI alert customer)  कोरोना काळात अशाप्रकारच्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वृद्ध व्यक्तींना ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात ट्रॅप करण्यात येत असून खोटी माहिती सांगून त्यांच्याकडून संपूर्ण डिटेल्स घेऊन बँक खाते रिकामे करण्यात येत आहेत. या वाढत्या सायबर क्राइमच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्टेंट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

बँकेच्या एका ग्राहकाला KYC Updation साठी फोनवर आलेला मेसेज त्याने SBI ला ट्विट करत ऑनलाईन फ्रॉड होत असल्याची माहिती दिली. या ट्विटला उत्तर देत SBI ने कोणत्याही अकाउंट होल्डरला अशाप्रकारचे मेसेज,मेल, फोन किंवा कोणतीही लिंक आल्यास त्यापासून सावध रहा असा इशारा दिला. ऑनलाईन फसवणूक कशी केली जाते? अशाप्रकारचा फ्रॉड झाला तर त्याची तक्रार कुठे करायची? यासारख्या फसवणूकीपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची? जाणून घ्या.

कशाप्रकारे होतेय फसवणूक?

फ्रॉड करणारे लोक आपण SBI कर्मचारी,पोलीस किंवा केव्हायसी अधिकारी असल्याचे सांगून ग्राहकांशी एखाद्या अनोळखी क्रमांकावरुन ग्राहकांना फोन कॉल्स, मेसेज,मेल किंवा लिंकद्वारे संपर्क साधतात. ऑनलाईन KYC अपडेट करा असे सांगितले जाते. त्यातून तुमचे संपूर्ण बँक डिटेल्स घेऊन बँकेचे खाते निकामी केले जाते.

कुठे तक्रार कराल?

काय काळजी घ्याल?

First Published on: August 2, 2021 1:33 PM
Exit mobile version