Dell ने लॉंच केला १४ इंची टू-इन-वन लॅपटॉप; हे आहेत फिचर्स

Dell ने लॉंच केला १४ इंची टू-इन-वन लॅपटॉप; हे आहेत फिचर्स

कॉर्पोरेट ग्राहकांकरिता डेल इंडियाने १४ इंच असणारा टू-इन-वन लॅपटॉप लॅटीट्यूड ७००० सिरीजला भारतात लॉंच करण्याच आले आहे. ज्याची किंमत १ लाख ३५ हजार रूपयांपासून सुरू आहे. नवीन आलेला लॅटीट्यूड ७४ हजार टू-इन-वन प्रॉक्‍सिमिटी सेंसरसह येतो, तो इंटेल कॉनटेक्‍स्‍ट सेंसिंग टेक्‍नोलॉजीपेक्षा कमी आहे.

हे आहेत खास फिचर्स

हा लॅपटॉप ज्यावेळी स्लीप मोडमध्ये जातो त्यावेळी आपोआप फेसिअल रेकग्निशनकरिता त्याची स्कॅनिंग सुरू होते. ज्यावेळी लॅपटॉपपासून युजर्स काही अंतरावर जातो त्यावेळी आपोआप लॅपटॉप लॉक होतो, यामुळे बॅटरीची लाईफ वाचून लॅपटॉप सुरक्षित राहू शकेल.

डेलच्या या नव्या लॅपटॉपच्या पॉवर बटणाला फ‍िंगरप्रिंट रीडर सारखा नवं फिचर देण्य़ात आले आहे. या लॅपटॉपचा एक्सप्रेस कनेक्ट फिचर डिव्हाईसला उपलब्ध असणाऱ्या वाय-फाय सुविधेमध्ये चांगल्याप्रकारे कनेक्ट होऊन जलग गतीने त्यांची रचना करण्यात आली आहे.

तसेच, डेल कंपनीकडून असे सांगण्यात येत आहे की, लॅपटॉपच्या चार्जिंग फिचरमध्ये युजर्सना एका तासात ८० टक्के बॅटरी चार्ज करण्याची क्षमता आहे. अशा अनेक फिचरमुळे ग्राहकांना लॅपटॉप वापराने अधिक सुलभ होईल.

 

First Published on: June 13, 2019 5:10 PM
Exit mobile version