तुम्हीही Pixlr वापरताय? हॅकर्सने १९ लाख युजर्सचा डेटा केला लिक

तुम्हीही Pixlr वापरताय? हॅकर्सने १९ लाख युजर्सचा डेटा केला लिक

तुम्हीही Pixlr वापरताय? हॅकर्सने १९ लाख युजर्सचा डेटा केला लिक

शायनीहंटर नावाच्या एका हॅकरने १.९ मिलीयन लोकांचा डाटा एका ऑनलाईन फोटो एडिटींग अॅप्लिकेशन पिक्सएलआर या एपवरुन चोरुन लिक केला आहे. हॅकिंग फोरममध्ये विनामूल्य सादर केलेल्या माहितीनुसार चोरी झालेला डेटा वापरकर्त्याला धमकी देण्यासाठी तसेच खंडणीसाठी वापरला जाऊ शकतो. लिक करण्यात आलेल्या डेटाच्या माहितीमध्ये लोकांचे इमेल, लॉग इनची नावे, पासवर्ड, वापरकर्त्यांची संपूर्ण माहिती एसएचए-५१२हॅश पासवर्डही असल्याचे समजते आहे. शायनी हंटर्सने १२३rf स्टॉक फोटो साइटमध्ये प्रवेश करताना पिक्सएलआरकडून डाटा चोरी केल्याचा दावा केला आहे. पिक्सएलआर आणि १२३rf हे दोन्ही कंपनी इनमाइजीनच्या मालकीच्या आहेत.

यापूर्वीही टोकोपीडिया, होमशेफ, मिंट, चॅटबुक, डेव, प्रोमो, मॅथवे, वॅटपॅड अशा कंपन्यांचा डाटा चोरी करण्यातही शायनी हंटरचा समावेश होता. धमकी देण्यात आलेल्या अभिनेत्याने सांगितले की, त्याने २०२०च्या शेवटी एडब्लूएसच्या बकेटमधून डाटा डाऊनलोड केला होता.

हॅकिंग फोरमवर डाटा सामायिक केल्यामुळे धमकी देण्यात आलेल्या अभिनेत्यांकडून शायनी हंटर्सला शाबासकी मिळत आहे. हे वापरकर्ते नेहमी या संकेतस्थळाला भेट देत असतात. पिक्सएलआरकडून डेटा चोरी झाला असला तरी पिक्सएलआरकडून अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. डेटा लिक करण्यात आलेले अनेक वापरकर्ते हे पिक्सएलआरचे रजिस्टर मेंबर आहेत. तसेच पिक्सएलआरच्या वापरकर्त्यांना सुचित करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या अकऊंटचे पासवर्ड बदलून दुसरा ठेवावा. या प्रकरणाची माहिती ब्लिपींग कम्प्युटरनेही दिली आहे.

वापरकर्त्यांनी काय केले पाहिजे?

पिक्सएलआर वापरकर्त्यांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटचा त्वरित पासवर्ड बदलावा. नवा पासवर्ड ठेवताना त्यामध्ये अंक, सांकेतिक शब्दांचा वापर करावा तसेच इतर कोणत्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेला पासवर्ड ठेवू नये.

First Published on: January 21, 2021 9:56 PM
Exit mobile version