सरकारचा मोठा निर्णय, १५ हजारांनी स्वस्त होणार इलेक्ट्रीक स्कुटर

सरकारचा मोठा निर्णय, १५ हजारांनी स्वस्त होणार इलेक्ट्रीक स्कुटर

देशात इलेक्ट्रिक स्कूटर व मोटारसायकल (ई-टू व्हीलर) स्वस्त होणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारने विद्यमान FAME-2 योजनेत बदल करुन वाहनांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ केली आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना प्रति kwh १० हजार रुपयांचे अनुदान १५ हजार रुपये करण्यात आले आहे.

ई-दुचाकींच्या विक्रीला चालना देण्यासाठी प्रयत्न

शासनाच्या अनुदानाच्या वाढीमुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीला चालना मिळणार आहे. पारंपारिक दुचाकी वाहनांच्या तुलनेत सध्या ई-दुचाकी २०,००० रुपयांनी महाग आहेत. परंतु अनुदान वाढवून अधिकाधिक लोकांना ई-वाहन खरेदी करण्यासाठी सरकार प्रवृत्त करत आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी खूप मदत होईल. अलीकडे, Ather नावाच्या कंपनीने आपल्या फ्लॅगशिप 450x इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १४,४०० रुपयांनी कमी केली आहे.

ई-बस मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची तयारी

सरकारच्या या घोषणेनंतर ई-वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. फेम -2 नियमात सुधारणा करून, सरकारला अनुदान वाहनांच्या किंमतीच्या ४० टक्के पर्यंत नेण्याची इच्छा आहे. सरकारला मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बस आणि तीन चाकी वाहन खरेदी करायच्या आहेत. EESL ला लवकरच तीन लाख इलेक्ट्रिक ई-रिक्षा खरेदी करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.

 

First Published on: June 13, 2021 8:56 PM
Exit mobile version