हॉनरचे नवे मोबाइल्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

हॉनरचे नवे मोबाइल्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

हॉनर ७ ए

चायना टेलिकॉम कंपनी हुआवे ने आज भारतात एका नव्या स्मार्टफोन्सचे लाँच केले आहे. हॉनर ७ ए आणि ७ सी हे दोन नवे स्मार्ट फोन ग्राहकांना लवकरच उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी लाँच केले जात आहे. सर्वसामान्यांना परवडण्यासाठी या फोनची किंमत ही १० हजार रुपयांच्या घरात असेल अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

जाणून घ्या नवीन फीचर्स –
या दोन्ही फोनमध्ये इतर स्मार्टफोन्स पेक्षा काही अलग फीचर्स आहेत. सर्वसामान्य बजेटमध्ये असला तरीही त्यामध्ये फेस अनलॉक, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि फुल व्हिव डिस्प्ले हे फीचर्स उपलब्ध आहेत. या दोन्ही फोन्सचा डिस्प्ले हाय डेफीनेशन (एचडी) असल्यामुळे यावर चित्रपट बघण्याचा एक वेगळाच अनुभव ग्राहकांना मिळणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ड्युअल सिमची सुविधा आहे.

हॉनर ७ ए फीचर्स –

– हॉनर ७ ए ८.० व्हर्जन आहे. ५.७ इंच एचडी डीस्प्ले आहे.

– या फोनमध्ये ४३० ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर आहे. या फोन्समध्ये २ ते ३ जीबीचा रॅम तर इंटरनल ३२ जीबी स्टोरेज उपलब्ध आहेत.

– लाँग पॉवर बॅकअपसाठी ३००० एमएएचची बॅटरी वापरली गेली आहे. या फोन्सला १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा आहे.

हॉनर ७ सी फीचर्स – 

–  हॉनर ७ सी ८.० व्हर्जन आहे. ५.९९ इंच एचडी डीस्प्ले आहे.

– ३ ते ४ जीबी रॅम असून ३२ ते ६४ जीबी इंटरनल मोबाईल मेमरी आहे.

 

First Published on: May 22, 2018 9:17 AM
Exit mobile version