फेसबुकमधून झकेरबर्ग पायउतार होणार?

फेसबुकमधून झकेरबर्ग पायउतार होणार?

फेसबुक सध्या सर्वात लोकप्रिय समाजमाध्यम. फेसबुक म्हटलं की आपल्याला एक नाव अगदी सहज आठवते ते मार्क झकेरबर्गचं!! त्याला काही जण अगदी प्रेमानं झुक्या देखील म्हणतात. पण, आता झकेरबर्गला फेसबुकच्या अध्यक्षपदावरून पायउतार करा अशी मागणी होत आहे. गुतंवणूकदारांनी ही मागणी केली आहे. काही मार्केटिंक कंपन्यांना डेटा विकल्यामुळे कंपनीचे प्रमुख झकरबर्ग यांनी कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. न्यूयॉर्क टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार फेसबुकनं त्यांच्या टिकाकारांना वेगवेगळ्या मार्गानं गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे.  फेसबुकने त्यांची खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी डिफायनर्स पब्लिक रिलेशन्स या कंपनीला कंत्राट दिलं होतं. २०१६च्या अमेरिका निवडणुकीमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्यानं तसेच केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकमुळे अडचणीत आल्यानंतर कंपनीनं पीआर कंपनीची मदत घेतली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी मात्र मार्क झकेरबर्ग यांच्या पायउतार होण्याची मागणी केली आहे.

First Published on: November 18, 2018 11:17 AM
Exit mobile version