Flipkart वर ‘१ रुपयांत’ करा खरेदी!

Flipkart वर ‘१ रुपयांत’ करा खरेदी!

Flipkart या ई-कॉमर्स वेबसाईटने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. नुकताच Flipkart कंपनीने WallMart सोबत करार केला होता. या करारानंतर फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी अनेक दर्जेदार आणि आकर्षक ऑफर्स जारी केल्या आहेत. ज्याअंतर्गत स्मार्टफोन, अॅक्सेसरीज, होम अपलायन्सेस तसंच ग्रॉसरीसारख्या अनेक वस्तूंवर भरघोस सूट दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता फ्लिपकार्टने ग्राहकांना केवळ १ रुपयांत गृहपयोगी वस्तू देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही Flipkart वरुन केवळ १ रुपयांत घरचं सामान खरेदी करु शकणार आहेत. या बंपर ऑफरअंतर्गत तुम्ही शँपू, डाळ, तेल आदी वस्तू अतिशय स्वस्त दरात खरेदी करु शकणार आहात. Flipkart वर ग्रॉसरी स्टोअर ‘SuperMart’ या नावाने रजिस्टर आहे. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला Today’s Steal Deals ही कॅटेगरी दिसेल. ज्यामध्ये जाऊन तुम्ही तीन विविध प्रकारचं सामान केवळ १ रुपयामध्ये खरेदी करु शकणार आहात. मात्र, यासाठी एक अट आहे.

‘कॅशबॅक’ची देखील सुविधा

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक महत्वाची अट पाळावी लागणार आहे. १ रुपयात ३ वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी ५९९ रुपयांची ऑनलाईन खरेदी करावी लागणार आहे. ही खरेदी केल्यानंतरच ग्राहक १ रुपयामध्ये एक किलो डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर राईचं तेल खरेदी करु शकणार आहेत. त्यातही जे ग्राहक सामान खरेदी करण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या कार्डचा वापर करतील त्यांना कॅशबॅकचा लाभही मिळणार आहे. Axis बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास त्या ग्राहकांना १५ टक्क्यांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ५९९ रुपयांच्या खरेदी व्यतिरीक्त १,५०० रुपयांची जादाची खरेदी करावी लागणार आहे.

First Published on: January 7, 2019 4:03 PM
Exit mobile version