सुवर्णसंधी! Oppo A33 चा १३ हजारांचा फोन मिळतोय ३,५९७ रुपयांत

सुवर्णसंधी! Oppo A33 चा १३ हजारांचा फोन मिळतोय ३,५९७ रुपयांत

ओप्पोचा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. ओप्पोच्या Oppo A33 चा आज फ्लिपकार्टवर सेल सुरु झाला. पहिला सेल आज १२ वाजल्यापासून सुरु झाला. या सेलमध्ये तुम्हाला १२ हजार ९९० रुपयांचा फोन बायबॅक ऑफरनुसार केवळ ३ हजार ५९७ रुपयात खरेदी करता येवू शकणार आहे. फेस्टिव्ह सिझनमध्ये या फोनला लाँच करण्यात आलं. यावेळी अनेक ऑफर्स देण्यात आल्या. या फोनचा सेल आज २९ ऑक्टोबरला सुरु झाला.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर २९ ऑक्टोबर पासून म्हणजेच आजपासून बिग दिवाली सेल सुरू होणार आहे. हा ससेल ४ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. या सेलमध्ये Oppo A33 हा स्मार्टफोन १२ हजार ९९० ओरिजनला किंमती ऐवजी ११ हजार ९९० रुपयात खरेदी करता येणार आहे. शिवाय, फ्लिपकार्ट एक क्रेजी डेली ऑफर करीत आहे. बायबॅक गॅरंटी ऑफर फ्लिपकार्टवर देत आहे. ग्राहकांना हा फोन बायबॅक गॅरंटी सोबत ३५९७ रुपयांच्या इफेक्टिव किंमतीत खरेदी करता येवू शकतो.

बायबॅकनुसार फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला चेकआउट करताना Buyback Guarantee हा ऑप्शन निवडावा लागेल. बायबॅक गॅरंटी म्हणजेच फोनची बाकीची किंमत ६ ते ८ महिन्यात दुसरा फोन खरेदी केल्यावर तुम्हाला डिस्काउंट म्हणून मिळणार आहे. यासाठी तुम्हाला ६ ते ८ महिन्यात दुसरा फोन खरेदी करण्यावर तुम्हाला ३५९७ रुपये कापून बाकीचे पैसे डिस्काउंट म्हणून मिळतील. शिवाय, एक्सचेंज म्हणून हा फोन द्यावा लागणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट वाला ६.५ इंच एचडी प्लस होल पंच डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेसंर देण्यात आला आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये मोठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा डिव्हाईस 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

 

First Published on: October 29, 2020 8:49 PM
Exit mobile version