खरेदीसाठी राहा तयार; या तारखेपासून सुरु होतोय Flipkart चा बिग बिलियन डेज सेल

खरेदीसाठी राहा तयार; या तारखेपासून सुरु होतोय Flipkart चा बिग बिलियन डेज सेल

भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून आ-कॉमर्स कंपन्या सज्ज झाल्या आहेत. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज २०२० सेलची घोषणा केली आहे. येत्या १६ ऑक्टोबरपासून हा सेल सुरु होणार असून २१ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये अनेक डील्स आणि ऑफर्सचा पाऊस पडणार आहे.

फ्लिपकार्टने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर भागीदारीही केली आहे. यामुळे ग्राहकांना SBI कार्ड खरेदीवर १० टक्के त्वरित सूट मिळेल. तसंच, फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना १५ ऑक्टोबरला बिग बिलियन डेज सेलच्या डील आणि ऑफर्समध्ये लवकर प्रवेश मिळणार आहे.

SBI कार्ड इन्स्टंट सवलतीच्या सोबत फ्लिपकार्ट दुकानदारांना Bajaj Finserv EMI कार्ड्स आणि आघाडीच्या बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळतील. याशिवाय पेटीएम वॉलेट आणि पेटीएम यूपीआयसह खरेदी करणार्‍या ग्राहकांना खरेदीवर कॅशबॅक देखील मिळणार आहे.बिग बिलियन डेज २०२० च्या सेल दरम्यान फ्लिपकार्टवर मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, अ‍ॅक्सेसरीज आणि अन्य घरगुती उपकरणांवर डिल्स आणि सूट मिळेल. फ्लिपकार्ट प्रमाणे Amazon ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आयोजित करणार आहे. कंपनीने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.

 

First Published on: October 3, 2020 8:44 PM
Exit mobile version