हेल्दी पदार्थ निवडीण्यासाठी ‘हे’ अॅप उपयुक्त…

हेल्दी पदार्थ निवडीण्यासाठी ‘हे’ अॅप उपयुक्त…

फूडस्विच अॅप

सध्याचा जमाना हा मोबाईल Apps चा जमाना आहे. वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त ठरतील अशी अगणित अॅप्स आज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर चॅटिंग करण्यापासून ते थेट घरबसल्या कुठलीही गोष्ट मागवण्यापर्यंत ही अॅप्स आपल्या कामी येतात. खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या अनेक ऑनलाईन अॅप्सविषयी तुम्हाला माहितीच असेल. मात्र, असं एक खास अॅप आहे जे तुम्ही विकत घेत असलेले पदार्थ हेल्दी आहेत की नाहीत, याची तुम्हाला माहिती देतं. संशोधकांनी विकसीत केलेल्या या अॅपचं नाव आहे ‘फूडस्विच’. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे संशोधक आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या संशोधकांनी मिळून हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवलं आहे.

असं काम करतं हे अॅप…

नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये हे ‘फूडस्विच’ अॅप लाँच करण्यात आले. हे अ‍ॅप भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगसोबत अन्य काही देशांमध्ये याआधीच लाँच झाले आहे. एखाद्या दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये गेल्यावर तिथल्या सील पॅक्ड पदार्थांवरील बारकोड तुम्ही फूडस्विच अॅपद्वारे स्कॅन करु शकता. या स्कॅनिंग प्रक्रियेमुळे तुम्हाला पदार्थामध्ये सामाविष्ट असलेले सर्व घटक आणि त्यांच्या गुणवत्तेविषयीची माहिती मिळते. या अॅपमध्ये हेल्थ स्टार रेटिंगचा पर्याय उपलब्ध आहे.

हे रेटिंग तुम्ही स्कॅन केलेल्या पदार्थाची ०.५ स्टार (हानिकारक) पासून ते ५ स्टार (अत्यंत चांगले) पर्यंत वर्गीकरण करतं. याशिवाय हे अॅप त्या पदार्थातील वेगवेगळ्या पोषक आणि हानिकारक घटकांची आणि त्यांच्या परिणामांची माहिती देतंं. एखाद्या पदार्थात साखर, फॅट्स, मीठ आदी पदार्थ खूप जास्त प्रमाणात असतील तर तो पदार्थ तुम्ही स्कॅन केल्यास, हे अॅप स्क्रीनवर लाल रंगाचा लाईट (धोका या अर्थी) दाखवतो. यामुळे सहाजिकच तुम्ही आरोग्यासाठी हानिकारक असलेले पदार्थ विकत घेणं टाळू शकता.

 

First Published on: July 3, 2018 7:34 PM
Exit mobile version