जगभरात विनामूल्य आणि मुक्त इंटरनेटवर होतायंत हल्ले- सुंदर पिचाई

जगभरात विनामूल्य आणि मुक्त इंटरनेटवर होतायंत हल्ले- सुंदर पिचाई

गूगल सीईओ सुंदर पिचाई

जगभरात स्वतंत्र आणि मुक्त इंटरनेटवर हल्ला होत असल्याचे गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले. यासह ते असेही म्हणाले की, बरेच देश माहितीच्या प्रवाहात अडथळे आणत आहेत, तर काही वेळा या मॉडेलवर गांभीर्याने विचार देखील करण्यात आलेला नाही. कॅलिफोर्नियामधील गुगलच्या मुख्यालयात एका मुलाखतीत, पिचाई यांनी इंटरनेटवरील जागतिक हल्ल्यासह अनेक मुद्द्यांविषयी मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या पंचवीस वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कंप्यूटिंगमध्ये जगात क्रांती घडवून आणतील.

चेन्नईमध्ये लहानाचा मोठा झालेल्या ४९ वर्षीय सुंदर पिचाई यांनी कर, गोपनीयता आणि डेटाशी संबंधित वादग्रस्त विषयांवरही भाष्य केले. पाळत ठेवणाऱ्या चिनी इंटरनेट मॉडेलवर पिचाई यांनी मात्र चीनचे नाव न घेता म्हटले की स्वतंत्र व मुक्त इंटरनेटवर हल्ला होत आहे. आमची कोणतीही प्रमुख उत्पादने आणि सेवा चीनमध्ये उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले. यासह कराच्या वादावर पिचाई म्हणाले, आम्ही जगातील सर्वात मोठे करदात्यांपैकी एक आहोत. गेल्या दशकाच्या सरासरीकडे पाहिले तर आम्ही २० टक्क्यांहून अधिक कर भरला आहे. यूएसमध्ये आम्ही एक मोठा हिस्सा म्हणून कर भरतो.

अमेरिकन नागरिक असलो तरी भारत माझ्या नसात

पिचाई यांच्या मुळांबद्दल विचारले असता, पिचाई म्हणाले, “मी अर्थातच एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु माझ्या नसात भारत आहे.” म्हणून मी कोण आहे हे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, मी कृत्रिम बुद्धिमत्ता एक अतिशय गंभीर तंत्रज्ञान मानतो, जे मानव विकसित करणार आहे आणि त्यावर पुढील कार्य मानवाकडून केले जाईल.

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई

पिचाई सुंदरराजन यांचा जन्म १० जून १९७२ ला तामिळनाडूतील मदुराई येथे झाला होता. जगभरात त्यांना सुंदर पिचाई याच नावाने ओळखले जाते.  एल्फाबेट ही गुगलची पेरेंट कंपनी आहे. म्हणजेच गुगलबरोबरच इतर काही कंपन्या अल्फाबेटच्या छत्राखाली येतात. सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ आहेत. त्याचबरोबर ते अल्फाबेटची उपकंपनी असेल्लया गुगलचेही सीईओ आहेत. मात्र सर्वसाधारणपणे त्यांना गुगलचे सीईओ असे संबोधले जाते.


१२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद आता मुंबई हायकोर्टात

First Published on: July 13, 2021 8:09 AM
Exit mobile version