जुना दो नया लो; जिओफोनची नवी ऑफर

जुना दो नया लो; जिओफोनची नवी ऑफर

जिओ फोनची जुने द्या, नवे घ्या ऑफर

फिचर फोन वापरकर्त्यांना रिलायन्स जिओ एक मोठी ऑफर घेऊन आले आहे. शुक्रवार २० जुलैपासून आपला जुना फिचर फोन देऊन नवा जिओ फोन अवघ्या ५०१ रूपयात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. नोकिया, ब्लॅकबेरी, मायक्रोमॅक्स असा कोणत्याही कंपनीचा मोबाईल बदलता येणार आहे. या जिओ फोन वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय अशा फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूब सारख्या अॅप्लिकेशनची उपलब्धता असेल.

फिचर फोनच मार्केट

भारतातील मोबाईल विक्री व्यवसायात एकत्रित अशी ३७ टक्के वाढ झाल्याची आकडेवारी काऊंटरपॉइंट या संशोधन क्षेत्रातील संस्थेने जाहीर केली आहे. २०१७ सालच्या अखेरच्या सत्रातील आकडेवारी या संस्थेने नुकतीच जाहीर केली. याच कालावधीत फिचर फोनच्या विक्रीतही ५५ टक्के इतकी वाढ झाली. गतवर्षीच्या मोबाईल विक्रीत स्मार्टफोनची मक्तेदारी पहायला मिळाली खरी, पण फीचर फोनने केलेले दमदार कमबॅकही विसरता येणार नाही. २०१७ मध्ये फिचर फोनची विक्री ६४ टक्के होती. तर २०१६ मध्ये ही विक्री ५८ टक्के इतकी होती.

जिओ फोनच्या जुलै २०१७ मध्ये फीचर फोन लाँचिंगनंतर आतापर्यंत २ कोटी ५० लाख मोबाईल वापरकर्ते जिओ फोनचा वापर करत आहेत. छोटी शहरे तसेच खेडोपाडी स्मार्ट फिचर फोनची उपलब्धता करून देण्यात जिओचा वाटा महत्वाचा ठरला आहे. जिओ फोनचा माध्यमातून ४जी सेवा अतिशय गुणवत्तापूर्ण अशी पुरवली जात आहे, पण ग्राहकांमार्फत अधिकाधिक सेवांची मागणी सातत्याने होत आहे.

काय आहेत नवे फिचर?

उत्तम आणि जलद ४ जी कनेक्टिव्हिटी आणि व्हॉईस कमांड फिचर यांचा पहिल्यांदाच फिचर फोन वापरकर्त्यांनाही उपयुक्त ठरेल. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूब यासारखे अॅप्लिकेशन व्हॉईस कमांडरने वापरता येतील.

ऑपरेटींग सिस्टिम

KIAOS या या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या माध्यमातून फिचर फोन मार्केटमध्ये मुसंडी मारत जिओ फोनच अव्वल ठरणार आहे. आतापर्यंत फिचर फोन वापरकर्त्यांना कधीच अनुभवता न आलेले फिचर्स या ऑपरेटिंग सिस्टिमच्या निमित्ताने वापरणे शक्य होईल. जिओ डिजिटल लाईफची उपलब्धता ही प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गाव पातळीवर अनुभवायला मिळेल. जिओ फोन सध्या ग्राहकांना त्यांचा व्यवसाय, रोजगार निर्मिती, शिक्षणाचे सुलभीकरण, तत्काळ मनोरंजन, वैद्यकीय सेवा आदींसाठी उपयुक्त ठरत आहे.

First Published on: July 19, 2018 4:56 PM
Exit mobile version