खूशखबर! ह्युंदाईच्या गाड्यांवर मिळतेय दिड लाखांपर्यंत सूट

खूशखबर! ह्युंदाईच्या गाड्यांवर मिळतेय दिड लाखांपर्यंत सूट

खूशखबर! ह्युंदाईच्या गाड्यांवर मिळतेय दिड लाखांपर्यंत सूट

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ग्राहकांसाठी नवी ऑफर घेऊन आलं आहे. ह्युंदाईच्या गाड्यांची विक्री अधिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या किंमतीवर सवलत दिली जात आहे. Hyundai Kona इलेक्ट्रिक गाडीवर १.५ लाख रुपयांची रोकड सवलत दिली जात आहे. या कारची किंमत अंदाजे २५ लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त, डीलर्सना एंट्री लेव्हल ह्युंदाई कार सँट्रोवर सूट मिळत आहे.

Hyundai Grand i10 Nios वर ३० हजारांची सवलत

Hyundai Grand i10 Nios वर मोठी सवलत दिली जात आहे. आपण जर सीएनजी निवडल्यास २० हजार रुपयांची सूट आहे. जर आपण सूचीबद्ध कंपन्यांपैकी एक असाल तर तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट दिली जाईल. यासह १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जातो. स्टायलिश Hyundai Grand i10 Nios वर ३० हजार रुपयांहून अधिक रोख सवलत मिळत आहे. तथापि, हे केवळ दोन टर्बो पेट्रोल ट्रिमसाठी उपलब्ध आहे. एक्सचेंज आणि कॉर्पोरेट योजना सेंट्रोसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय पेट्रोल आणि डिझेल प्रकारांवर १० हजार रुपयांची रोकड सवलत उपलब्ध आहे.

असेच फायदे Nios, Aura वर मिळत आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या Hyundai i20 मध्ये केवळ १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. पाच हजार रुपयांचा कॉर्पोरेट फायदाही यावर उपलब्ध आहे.

 

First Published on: April 13, 2021 6:07 PM
Exit mobile version