आगामी दिवसांत सोने महाग होणार

आगामी दिवसांत सोने महाग होणार

Gold

लग्न मुहुर्ताची चाहूल लागल्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांकडून सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याची झळाळी अधिकच वाढणार आहे. सोन्याच्या भावात सोमवारी प्रतितोळा ३५० रुपयाने वाढ होऊन दर ३३ हजार ६५० रुपयांवर पोहचला होता. आगामी काळात सोने अधिकच महाग होणार अशी माहिती राष्ट्रीय सराफ संघटनेने दिली आहे.

नाणे निर्मिती आणि औद्योगिक वापरात येणार्‍या चांदीच्या भावात प्रतिकिलो ८५० रुपयाने वाढ होऊन ते ४० हजार ९०० रुपयांवर पोहोचले. विदेशातील बाजारपेठेत सोन्याच्या किमतीने १३०० डॉलर्सचा टप्पा प्रती औंस ओलांडला आहे. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्केे शुद्ध सोन्याच्या किमतीत ३५० रुपयांची वाढ झाली आहे. तर सोव्हर्जियन गोल्डमध्ये २०० रुपयाने वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ८५० रुपयाने वाढ होऊन ते ४० हजार ९०० प्रति किलोवर पोहोचले.

चांदीच्या नाण्यांची मागणी बाजारात वाढली आहे. १०० नाण्यांच्या दरात १ हजार रुपयाने वाढ होऊन त्यांची एकूण किंमत ७९ हजार रुपये झाली आहे.

First Published on: January 30, 2019 4:10 AM
Exit mobile version