गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार

गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार

गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार

भारतासह जगभरात कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे. यामुळे अनेक जण बरोजगार झाले आहेत. काही कंपन्यांनी आर्थिक संकटात अडकल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले तर काहींनी कर्मचाऱ्यांच्या पगारावर कैची चालवली. परंतु अशा परिस्थितीतही एक चांगली बातमी समोर आली आहे ती म्हणजे जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazonने मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी भारतासह काही देशांमध्ये ७५ हजार लोकांना रोजगार देणार आहे.

Amazonने सांगितले की, ‘कंपनी सुमारे ७५ हजार लोकांची भरती करणार आहे. वेअरहाउस स्टाफपासून ते डिलिव्हरी ड्रायव्हर्सपर्यंतची ही भरती असणार आहे.’ Reutersच्या माहितीनुसार Amazon सांगितले की, ‘कोरोना व्हायरसमुळे लोकं घरामध्ये कैद आहेत. ज्यामुळे ऑनलाईन ऑर्डरची मागणी वाढत आहे.’

सध्या खाण्या-पिण्याच्या आणि आरोग्यसंबंधीत उत्पादनचा साठा करण्याचा Amazon प्रयत्न करत आहे. कंपनीला अशावेळी स्टोअरमध्ये काम करणारे आणि डिलिव्हरी स्टाफची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर Amazonने रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे.

कोरोनाच्या काळात लोकांना नोकरीवर ठेवणे तितके सोपे नाही आहे. त्यामुळे कंपनीकडून नोकरीवर ठेवण्याआधी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल. तसेच कामावर ठेवणाऱ्या सर्व लोकांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाईल.

Amazonने नव्या लोकांना कामाकडे आकर्षित करण्यासाठी पगार वाढवण्याची योजना तयार केली आहे. कंपनीने प्रति तास १५ डॉलर किमान वेतन वाढवून २ डॉलर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान फ्रान्सची आयटी कंपनी Capgeminiने कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, ‘या काळात संपूर्ण जग एका भीतीच्या वातावरणात आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि ते जास्त उत्साहाने काम करतील. निश्चित याचे परिणाम चांगले होतील.’


हेही वाचा – WhatsApp च्या माध्यमातून पत्ता शोधण्यासह एखाद्याला ट्रॅक करणं होणार सोपं; वाचा सविस्तर


 

First Published on: May 14, 2021 9:55 AM
Exit mobile version