भारतात Google Nest Mini स्मार्ट स्पीकर लाँच; जाणून घ्या फीचर्स

भारतात Google Nest Mini स्मार्ट स्पीकर लाँच; जाणून घ्या फीचर्स

Google Nest Mini

यावर्षी गुगलने ऑक्टोबरमध्ये जागतिक बाजारपेठेत Google Pixel 4 स्मार्टफोनसह Nest Mini स्मार्ट स्पीकर लाँच केले आहे. हे उपकरण YouTube Music आणि JioSaavn सारख्या अनेक म्यूझिक स्ट्रीमला सपोर्ट करू शकतो. गेल्या वर्षी लाँच झालेल्या Google Home Mini चे अपग्रेड व्हर्जन आहे. या स्मार्ट स्पीकरला ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी करू शकतात. भारतात याची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे.

असे आहे Nest Mini ची डिझाईन

Google Nest Mini स्मार्ट स्पीकर Home Mini शी मिळता-जुळता आहे. याला कनेक्टर पोर्ट आणि केबल देण्यात आली असून या उपकरणाला खालच्या बाजूला मायक्रोफोन स्लाइडर स्विच आणि लाईट देण्यात आले आहे. Nest Mini स्मार्ट स्पीकरला अनेक म्यूझिक स्ट्रीमिंग सर्व्हिसेसला सपोर्ट करतात. यामध्ये YouTube Music, JioSaavn, Spotify, Gaana आणि Wynk Music हे देखील या स्पीकरमध्ये समाविष्ट आहे.

Google Nest Mini स्मार्ट स्पीकरच्या आवाजाची गुणवत्ता उत्तम आहे. हे उपकरण दोन रंगात उपलब्ध आहेत. तसेच हे उपकरणात ई-मेल वाचण्यासह अनेक काम हे करते. भारतीय बाजारात Google Nest Miniला Amazon Dot या उपकरणाशी जोरदार स्पर्धा सध्या सुरू आहे.

हे आहेत फीचर्स

First Published on: November 27, 2019 2:57 PM
Exit mobile version