जीमेलचं ‘कॉन्फिडेन्शल मेल’ नवं फीचर, ईमेलला नवं सुरक्षा कवच!

जीमेलचं ‘कॉन्फिडेन्शल मेल’ नवं फीचर, ईमेलला नवं सुरक्षा कवच!

गुगल I/O

मोठमोठ्या ऑफिसेसपासून ते अगदी लघुउद्योगांपर्यंत ऑफिशिअल कामांसाठी गुगलच्या जी-मेलाचा वापर सर्वाधिक होतो. जर तुम्ही जी-मेल वापरत असाल, तर जी-मेल युजर्ससाठी एक नवं फिचर गुगलने आणलं आहे. या फिचरमधून तुम्हाला तुमचे काही खास मेल ‘कॉन्फिडेंशल मेल’ (Confidential mail) म्हणून सेव्ह करता येणार आहेत.

युजर्सच्या वापरानुसार, गुगलने जी-मेलमध्ये आतापर्यंत अनेक बदल केले. अगदी जी-मेलच्या डिझाईन्सपासून ते हाताळण्यास कोणालाही सोपे वाटावेत, असे बदल आतापर्यंत करण्यात आले आहेत. आता ‘कॉन्फिडेंशल मेल’ नावाचा नवा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही पाठवलेल्या एखाद्या माहितीची गोपनीयता अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे. कारण या पर्यायात अशा मेल्सना ‘एक्सपायरी डेट'(Expiry date) असा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे हा ई मेल ठरवलेल्या कालावधीतच समोरच्या युजरला दिसू शकणार आहे. शिवाय काही गोपनीय माहिती असल्यास ती माहिती फॉरवर्ड, कॉपी आणि प्रिंटदेखील करता येणार नाही. त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांची अंतर्गत माहिती गोपनीय राहायला मदत होणार आहे.

दरम्यान, या ऑप्शनला अधिक सुरक्षित करण्याचं काम गुगलकडून सुरु आहे. एखादया मेलिशिअस प्रोग्रामकडून तुमचे कॉन्फिडेंशल मेल तुमच्या अटॅचमेंटसकट कॉपी होण्याची शक्यता असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.

नवं फिचर कसं वापराल?

First Published on: May 14, 2018 10:00 AM
Exit mobile version