‘इमोजी किचन’ द्वारे स्वत: तयार करू शकता इमोजी!

‘इमोजी किचन’ द्वारे स्वत: तयार करू शकता इमोजी!

गुगल आपल्या युजरसाठी कायम काहीतरी नवीन फीचर आणत असते. त्या प्रमाणेच यावेळेस देखील गुगलने एक आगळे- वेगळे फीचर लॉंच केले आहे. गुगलने लॉंच केलेल्या या फीचरमुळे युजरला आता स्वत: इमोजी तयार करता येणार आहे. चॅटिंग करताना कायम इमोजी वापरण्याची आवड असणाऱ्यांसाठी गुगल जी-बोर्ड वर चालणारं हे फीचर कंपनीने तयार केले आहे. या फीचरला इमोजी किचन (Emoji Kitchen)असे नाव देण्यात आले आहे.

स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला बहुतांश वेळेस, मेसेज करताना इमोजीचा वापर करायला फार आवडते. त्यामुळे गुगलचे हे फिचर युजर्सच्या पसंतीस उतरणार असल्याचे दिसत आहे. या इमोजी किचनद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे इमोजी कस्टमाइज करू शकता, यामुळे युजरला त्याच्या आवडीने इमोजी मर्ज करून नवीन इमोजी बनवता येणार आहे. हे App वापरण्यासाठी युजर्सना गुगल जीबोर्ड अपडेट कराव लागणार आहे.

प्रीपेड युजर्ससाठी गुगलची खास ऑफर

गुगलने मागील काही दिवसांपूर्वी प्रीपेड युजर्ससाठी सर्चद्वारे मोबाइल रिचार्जचा पर्याय उपलब्ध करून देणारे फीचर लाँच केले आहे. यात एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलच्या प्रीपेड युजर्ससाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे. गुगलच्या या नव्या फीचरद्वारे अँड्रॉइड फोनवर प्रीपेड मोबाइल रिचार्जचे प्लॅन्स सर्च करता येणार आहेत. तसेच चांगला प्लॅन कोणता याची तुलना देखील युजर्स करू शकणार आहेत. याशिवाय सर्चद्वारेच युजर्सना मोबाइल रिचार्ज सुद्धा करता येणार आहे.

First Published on: February 17, 2020 6:02 PM
Exit mobile version