रस्ता चुकलात? गुगल मॅपचे ‘हे’ फीचर ठरणार उपयुक्त

रस्ता चुकलात? गुगल मॅपचे ‘हे’ फीचर ठरणार उपयुक्त

गुगल मॅपमध्ये नवीन फीचर

नवीन शहरातील रस्ते अनोळखी असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा त्यांची फसवणूक देखील होते. त्यामुळे रस्ता चुकलेल्या प्रवाशांना वाट दाखविणारे नवीन फिचर गुगल मॅप लवकरच लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला हे फिचर केवळ भारतीयांसाठीच उपलब्ध असणार आहे.

नवीन प्रवासी, महिला प्रवाशांसाठी उपयुक्त फीचर

गेले काही दिवसांपासून गुगल मॅप्स नवीन फीचर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. भारतीयांना गुगल मॅप्सवर ‘ऑफ रूट’ अलर्ट नावाचे फीचर उपलब्ध होणार आहे. एका रिपोर्टनुसार, टॅक्सी, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे अॅप विकसित करण्यात येणार आहे. याद्वारे टॅक्सी किंवा कॅब निर्धारीत मार्गापेक्षा ५०० मीटरपेक्षा अधिक चुकीच्या मार्गाने जात असल्यास गुगल मॅप्सकडून युजर्सला याबाबत ताबडतोब अलर्ट मिळणार आहे. नवीन प्रवासी, महिला प्रवासी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फीचर महत्वपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे शॉर्टकटच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक रोखण्यात गुगल मॅप्समधील हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. सुरूवातीला केवळ भारतीयांनाच गुगल मॅपवरील या फीचरचा वापर करता येणार आहे.

First Published on: June 12, 2019 4:41 PM
Exit mobile version