Google Map सांगणार Eco-Friendly रस्ते! वाचा सविस्तर

Google Map सांगणार Eco-Friendly रस्ते! वाचा सविस्तर

कोणत्याही नवीन ठिकाणी भेट द्यायची असेल आणि आपण त्या जागी नवखे असू तर शक्यतो आपण जास्त टेन्शन घेत नाही. कारण सध्या कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये Google Map हे अॅप्लिकेशन आवर्जून असतेच. त्यामुळे गुगल मॅपने रस्त्यात येणाऱ्या बऱ्याच समस्या मोठ्या प्रमाणात दूर केले आहे. यापूर्वी, ज्या मार्गांवर प्रवास करायचा असेल आणि जर तो मार्ग माहित नसेल तर त्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी गुगल मॅपद्वारे सहजरित्या दूर केल्यात. अशातच Google चे हे अॅप आणखी एक नवी सेवा त्यांच्या युजर्ससाठी आणत असल्याचे सांगितले जात आहे. यानुसार, गुगल मॅप आता तुम्हाला ज्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नसेल किंवा कोणता मार्ग इको-फ्रेंडली मार्ग आहे. जेथे कमीतकमी प्रदूषण असेल, तो मार्ग गुगल मॅप तुम्हाला दाखवणार आहे. गुगलने ही नवी सेवा मंगळवारी जाहीर केली आहे.

गुगलने या वर्षापासून अमेरिकेतून ही नवीन ईको-फ्रेंडली मार्ग दाखवण्याती सेवा सुरू केली. त्याचबरोबर बर्‍याच देशांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येत आहे. हवामानात होणारे बदल आणि वाढणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी गुगलने गुगल मॅपची ही नवी सेवा सुरू केली असल्याचे म्हटले आहे. यासह कंपनीकडून असेही सांगितले जात आहे की, कोणताही युजर्स ज्यावेळी एकादा नवा मार्ग गुगल मॅपवर शोधेल त्यावेळी त्याला सर्वप्रथम ईको-फ्रेंडली मार्गच दाखवण्यात येईल. ईको-फ्रेंडली मार्ग दाखवताना त्यांचे अंतर जर जास्त असेल तर त्या मार्गाला दुसरा पर्यायी मार्ग देखील उपलब्ध असेल, असे गुगल मॅपने युजर्सना सांगितले आहे.

जगातील अर्ध्याहून अधिक ईको-फ्रेंडली मार्गांची माहिती उपलब्ध झाली आहे, परंतु अशा काही मार्गांचा शोध घेतला जात आहे, जे मार्ग सर्वात कमी वेळात लोकांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचवतील आणि कमी कार्बन उत्सर्जित करतील, यासह त्यांचा प्रवास आनंददायी होण्यास मदत होईल. यासोबच लोकांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल, तसेच पर्यावरणाच्या सानिध्यातून लोकांना त्यांचा प्रवास करता येईल, असे गूगल प्रोडक्टते डायरेक्टर रसेल डिकर यांनी सांगितले.

First Published on: March 31, 2021 12:04 PM
Exit mobile version