Driving License आणि RC बुकची वैधता संपली आहे, तर काळजी करू नका; सरकारने पुन्हा वाढवली तारीख

Driving License आणि RC बुकची वैधता संपली आहे, तर काळजी करू नका; सरकारने पुन्हा वाढवली तारीख

Driving License आणि RC बुकची वैधता संपली आहे, तर काळजी करू नका; सरकारने पुन्हा वाढवली तारीख

सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि आरसी (RC), परमिट सारख्या मोटार वाहन कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सांगितले की, अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये अशा सर्व कागदपत्रांचा समावेश केला आहे, ज्यांची वैधता १ फेब्रुवारी २०२१मध्ये संपली होती किंवा ३० सप्टेंबरला २०२१ला संपणार आहे.

यापूर्वी ५ वेळा वाढवली मुदत

मंत्रालयाच्या अॅडव्हायझरीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती केली आहे की, नागरिकांना, वाहतूकदारांना आणि विविध संघटना, जे या कठीण काळात काम करत आहे, त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. यासाठी ही अॅडव्हायझरी लागू करावी.

माहितीनुसार, पहिल्यांदा कागदपत्राच्या वैधताची मुदत ३० मार्च २०२० होती, त्यानंतर ९ जून २०२० केली. मग २४ ऑगस्ट २०२० केली. त्यानंतर २७ डिसेंबर २०२० केली आणि मग २६ मार्च २०२१ केली. मोटार वाहन कायदा-१९८८ संबंधित कागदपत्रांची वैधताच्या विस्तार संबंधित अॅडव्हायझरी जारी केली होती.

दरम्यान भारतात अजूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन ४ लाखांहून ५० हजारावर आली आहे. त्यामुळेच केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये सहाव्यांदा मुदतवाढ केली आहे.

First Published on: June 22, 2021 1:23 PM
Exit mobile version