फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; हॅकर्सने २७ कोटी वापरकर्त्यांचा डेटा विकला

फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; हॅकर्सने २७ कोटी वापरकर्त्यांचा डेटा विकला

फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरला

फेसबुक वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात फेसबुकवर अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, आता हॅकर्सनी कोट्यवधी फेसबुक वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती विकल्याची माहिती आहे. ताज्या अहवालानुसार हॅकर्सनी २६ कोटी ७० लाख फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा फक्त ५०० युरो (सुमारे ४१,६०० रुपये) मध्ये विकला आहे. या डेटामध्ये वापरकर्त्यांचा ईमेल आयडी, नाव, फेसबुक आयडी, जन्म तारीख आणि फोन नंबर समाविष्ट आहे. चांगली गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांचे संकेतशब्द (पासवर्ड) अद्याप सुरक्षित आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक अहवालही समोर आला होता, ज्यात २६ कोटी ७० लाख फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरी झाली होती.

सायबल यांनी दिलेल्या वृत्तानुसार, २६ कोटी ७० लाख फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा चोरल्यानंतर केवळ ५०० युरो (सुमारे ४१,६०० रुपये) मध्ये विकला गेला आहे. अहवालानुसार फेसबुक वापरकर्त्यांच्या चोरीच्या डेटामध्ये त्यांचा ईमेल आयडी, नाव, फेसबुक आयडी, जन्मतारीख व फोन नंबरचा समावेश आहे. तथापि, हॅकर्सनी या डेटामध्ये संकेतशब्दांचा समावेश नाही आहे.


हेही वाचा – क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह Oppo A52 लाँच


सायबलने दावा केला आहे की, त्यांच्या संशोधकांनी या सेलची माहिती मिळविली आहे आणि ते हा डेटा डाउनलोड आणि व्हेरिफाय करण्यात सक्षम आहेत. कंपनी म्हणते “या क्षणी आम्हाला डेटा कसा लीक झाला याची माहिती नाही. तृतीय-पक्ष अनुप्रयोग प्रोग्रामिंग इंटरफेस (Third-party application programming interface) मधील लीक किंवा स्क्रॅपमुळे हे होऊ शकतं.”

 

First Published on: April 21, 2020 11:40 PM
Exit mobile version