हार्ले डेविडसनची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च

हार्ले डेविडसनची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च

हार्ले डेविडसन कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक ‘लाइव वायर’ बाइक लॉन्च केली आहे. ही बाईक २०२० पर्यंत बाजारात येणार आहे. खास गोष्ट अशी आहे की, या बाईकवर दोन वर्ष मोफत सुविधा मिळणार आहे. हार्ले डेविडसनच्या या बाईकची किंमत २९,७९९ डॉलर म्हणजे २० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या कंपनीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये ग्राहकांना असे सांगितले आहे की, या बाईकला इलेक्ट्रिफाई अमेरिका स्टेशनवर चार्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच वर्षाच्या शेवटी ही बाईक अमेरिका, कॅनड आणि युरोपिय देशामध्ये उपलब्ध केली जाईल.

माहितीनुसार, ही नवी ‘लाइव वायर’ बाईक सिंगल चार्जवर २३५ किमी दूर जाऊ शकते. ‘लाइव वायर’ बाईक ही ३.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तासाला धावू शकते. या बाईकमध्ये इलेक्ट्रिक मोटर १०३पीएस आणि ११६एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकला ४० मिनिटात ८० टक्के चार्जिंग होते. हार्ले डेविडनसनच्या ‘लाइव वायर’ या बाईकचे डिझाईन इतर हार्लेच्या बाईकपेक्षा वेगळे आहे. या बाईकमध्ये बऱ्याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या बाईकचे डिझाईन हे स्ट्रीट रायडरच्या दृष्टीकोनातून केले आहे.

या बाईकमध्ये सात वेगवेगळे रायडिंग मोड्स आहे. यात ४.३ इंच रंगीत टीएफटी डिस्प्ले दिले आहे. तसेच या बाईकमध्ये रिफ्लेक्स डिफेन्सिव्ह रायडर सिस्टम, अॅन्टी लॉक ब्रॅकिंग सिस्टीम आणि कॉर्नर एन्हांस्ड ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम्स देण्यात आले आहे.

First Published on: July 15, 2019 5:35 PM
Exit mobile version