भारतात आता Harley-Davidson ची विक्री होणार नाही

भारतात आता Harley-Davidson ची विक्री होणार नाही

अमेरिकेची दिग्गज मोटरसायकल निर्माता हार्ले-डेव्हिडसन (Harley-Davidson) कंपनीने भारतातील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला असून भारतात आता Harley-Davidsonची विक्री होणार नाही आहे. भारतात गेली १० वर्षे ही कंपनी आहे. मात्र, पाहिजे तसा जम बसला नाही. नुकतंच कंपनीने आपली डीलरशिप भारतातील कमी किमतीच्या ठिकाणी हलविली आहे. कंपनीला रिस्ट्रक्चरिंगसाठी ७.५ कोटीचा खर्च आहे, तर ७० कर्माचाऱ्यांना कामावरुन काढलं जाणार आहे.

हार्ले डेव्हिडसनने गेल्या आर्थिक वर्षात भारतात २,५०० पेक्षा कमी युनिट्सची विक्री केली. हार्ले डेव्हिडसनने एक प्रसिद्ध पत्रक जारी करत भारतातील हार्ले-डेव्हिडसनचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दोन महिन्यांपूर्वी Harley-Davidson ने जाहीर केलं की ते पुन्हा आपलं लक्ष फायदा देणाऱ्या मोटारसायकली आणि अमेरिकेसारख्या प्रमुख बाजाराकडे वळवणार आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की ते आपले उत्पादन पोर्टफोलिओ कमी करणार असून कमी विक्री होणाऱ्या बाजारपेठेतून बाहेर पडणार आहे. त्यावेळी कोणत्या बाजारपेठेतून बाहेर पडणार हे सांगितलं नव्हतं. २०२० साठी कंपनीच्या एकूण रिस्ट्र्क्चरिंग खर्चाचा अंदाज १६.९ अब्ज डॉलर्स आहे. यात भारतातील सुमारे ७० कर्मचारी कमी करण्याचा समावेश आहे. भारतात हार्ले डेव्हिडसनची विक्री एकूण विक्रीपैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

 

First Published on: September 24, 2020 8:28 PM
Exit mobile version