असे पाठवा व्हॉटसअॅपवर नवे स्टिकर्स

असे पाठवा व्हॉटसअॅपवर नवे स्टिकर्स

व्हॉटसअॅपचे नवे स्टिकर्स (सौजन्य- firstpost)

व्हॉटसअॅप वापरणाऱ्या प्रत्येक युजर्ससाठी स्टिकर्स हे सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. कारण मेसेजपेक्षाही ते अधिक बोलके असतात. जर तुम्ही तुमचं व्हॉटसअॅप अपडेट केलं असेल तर आता तुम्हाला नवे स्टिकर्स वापरता येणार आहे. आता व्हॉटसअॅपने १३ नवे स्टिकर्स आणले असून काही स्टिकर्स तुम्हाला कस्टमाईज देखील करता येणार आहे. या स्टिकर्समध्ये कपी, कोमो, बनाना आणि बिस्कीट असे काही स्टिकर्स इमोजी यात आहेत.

कसे मिळतील हे नवे स्टिकर्स ?

१. तुमच्या फोनमधील व्हॉटसअॅप ओपन करा

२. कोणत्याही चॅट विंडोमध्ये गेल्यानंतर इमोजीज ओपन करा

३. इमोजीच्या खाली तुम्हाला स्टिकर्सचा पर्याय दिसेल

४. तुम्हला स्टिकर्सचे अनेक पर्याय दिसतील. पण ते तुम्हाला डाऊनलोड करावे लागतील.

 

पर्सनल स्टिकर ही करता येणार ?

जर तुम्हाला आणखी स्टिकर्स हवे असतील. म्हणजे कस्टमाईज करायचे असतील तर तुम्हाला तेही करता येऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधील दुसरे अॅप डाऊनलोड करावे लागतील. ज्यामध्ये तुम्हाला फेस्टिव्ह स्टिकर्स बनवता येतील.

 

First Published on: November 16, 2018 5:03 PM
Exit mobile version