या ट्रिक वापरून बदला रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचं नाव!!

या ट्रिक वापरून बदला रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचं नाव!!

अरे यार, अमुक एक प्रॉब्लेम झालाय त्यामुळे माझं बाहेर जाणं रद्द होतंय. आता रेल्वेचं तिकीट फुकट जाणार! रद्द करूया का रे? काय करावं बरं? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. केव्हा सुट्टीचा तर केव्हा इतर काही कारणास्तव आपला रेल्वे प्रवास रद्द झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो आता तिकीटाचं करायचं काय? पण, आता घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण तुमच्या नात्यातील कुणाच्याही नावावर असलेल्या तिकीटावरून आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर हे तिकीट ट्रान्सफर करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या टीप्स वापरून तिकीटावरून नाव बदलता येणार आहे किंवा तिकीट ट्रान्सफर करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला या काही सोप्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण, या ठिकाणी एक अट आहे, का तुमची तिकीट ही ऑनलाईन अर्थात IRCTCवरून काढलेली असावी.

१ ) तिकिटाची प्रिंट आऊट काढा.
२ ) तुमच्या जवळच्या रिझर्व्हेशन काऊंटरवर जा.
३ ) ज्या व्यक्तीला प्रवास करायचा आहे त्या व्यक्तीचं ओखळपत्र तिकीटाच्या प्रिंट आऊटसोबत आणा.
४ ) ओळखपत्र दाखवल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये नाव बदलून मिळेल.

पण, नावामध्ये बदल करण्याची सुविधा ही केवळ रेल्वे प्रवासाच्या २४ तास अगोदर उपलब्ध असणार आहे ही गोष्ट ध्यानात घ्या.

कुणाला करता येईल प्रवास?

तिकिटावरील नाव बदलून कुणीही प्रवास करेल का? तर नाही! त्यासाठी काही अटी आहेत. मुख्य म्हणजे तुमचं आणि प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तिचं रक्ताचं नातं हवं. अर्थात तुमच्या जागी प्रवास करू इच्छिणारी व्यक्ती ही तुमची आई, बाबा, भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा किंवा मुलगी असावी. यावेळी तुम्हाला तसा पुरावे देखील तिकीट काऊंटरवर घेऊन जावा लागणार आहे.

त्याशिवाय, व्हॉटसअॅपवर देखील तुम्हाला बुकींग स्टेटस आणि पीएनआर स्टेटस कळू शकणार आहे. त्यासाठी मेकमाय ट्रिपसोबत टाय अप करण्यात आलं आहे.

First Published on: November 16, 2018 11:48 AM
Exit mobile version