स्कूटर की बाईक? गोंधळात असाल तर या पद्धतीने निवडा

स्कूटर की बाईक? गोंधळात असाल तर या पद्धतीने निवडा

भारतात स्कूटरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. तथापि, दुचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशा परिस्थितीत दुचाकी विकत घेण्यापूर्वी काहीजण गोंधळात पडतात की बाइक खरेदी करायची की स्कूटर? विशेषत: जेव्हा लोक प्रथमच दुचाकी खरेदी करतात, तेव्हा त्यांच्या मनात असे प्रश्न उद्भवतात. आपण पहिल्यांदाच दुचाकी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर बाईक चांगली की स्कूटर अधिक चांगली आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पहिली गोष्ट

वास्तविक, दुचाकी खरेदी करण्यापूर्वी आपल्या गरजा लक्षात ठेवा, जसे की दुचाकीवरून तुम्हाला लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत असेल तर तुम्ही बाईक खरेदी करू शकता. प्रदीर्घ प्रवासात बाईक अधिक चांगली ठरते, त्यामुळे प्रवास सुखकर होईल. तसेच स्कूटरपेक्षा बाईक अधिक मायलेज देते.

दुसरी गोष्ट

दुचाकी वाहनांवरुन जर तुम्हाला बरेच सामान घेऊन जायचं असेल तर स्कूटर हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण स्कूटरला बाईकपेक्षा जास्त जागा मिळते. ज्यामध्ये आपण सहजपणे सामान घेऊन जाऊ शकता. याशिवाय स्कूटरमध्ये स्टोरेजची सुविधा उपलब्ध आहे.

तिसरी गोष्ट

बाईकपेक्षा स्कूटर स्त्रियांसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण स्कूटर चालविणे दुचाकीपेक्षा तांत्रिकदृष्ट्या सोपं आहे. स्कूटर कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी अधिक चांगली निवड आहे.

चौथा मुद्दा

या व्यतिरिक्त जर आपण अलीकडे वाहन चालविणे शिकले असेल तर स्कूटर खरेदी करणे आपल्यासाठी चांगले होईल. कारण नवीन ड्रायव्हरला बाईकपेक्षा स्कूटर चालविणे थोडे सोपे आहे.

पाचवी गोष्ट

ड्रायव्हरच्या उंचीनुसार दुचाकी निवडू शकता. जर ड्रायव्हर उंच असेल तर बाइक अधिक चांगली होईल. त्याच वेळी उंची सुमारे ५ फूट असेल तर स्कूटर खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. कारण बाईकमधील गिअर बदलण्यासाठी पायाचा वापर करावा लागतो. ज्यामध्ये कमी उंची असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

First Published on: April 3, 2021 6:43 PM
Exit mobile version