स्मार्टफोन्सची काळजी कशी राखाल

स्मार्टफोन्सची काळजी कशी राखाल

स्मार्टफोन्सची सफाई

स्मार्टफोन्स आज आपल्या जिवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. देशात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. आज प्रत्येकजण घारतून बाहेर पडण्यापूर्वी स्मार्टफोन्स घेऊन नक्की बाहेर पडतो. स्मार्टफोन नेहेमी नवाच राहावा किंवा त्याला काही होऊ नये याची काळजी आपण नेहेमी घेतो. मात्र सावधानी वापरुन सुद्धा अनेकदा आपल्या फोनला डाग किंवा फोन खराब होतो. अनेकदा पाण्यात भिजून फोन बंद पडतो अशा वेळी त्याला भंगारात फेकून दिण्या पलीकडे काही पर्याय उरत नाही.

आयफोनची काळजी कशी ठेवाल
– फोन जर स्विच ऑफ केल्यानंतर त्याची बॅटरी काढून ठेवा जर बॅटरी नॉन-रिमुव्हल आहे तर फक्त फोन स्विच ऑफ ठेवा
– फोन नेहेमी खुर्ची किंवा टेबलवर ठेऊनच साफ केले पाहिजेत. साफ करतेवेळी सर्व सामग्री जवळ ठेवणे आवश्यक आहे.
– जर फोनवर कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा कोणतेही कव्हर असेल तर ते काढून टाका.
– स्मार्टफोनची स्क्रीन सावकाश सुती कपड्याने पुसावी. पुसताना स्क्रीनवर दाब देण्याचा प्रयत्न करु नये.
– साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे लिक्विड हे प्रथम साफकरणाऱ्या कपड्याला लावावे व या कपड्याने स्क्रीन साफ करावी.
– धुळ साचलेला भाग साफ करण्यासाठी छोट्या ब्रशच वापर करा.
– फोनची मागील बाजू साफ करण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
– ऑडीओ, चार्जिंग आणि स्पीकर्स पोर्टला साफ करण्यासाठी फूंक मारावी किंवा ब्लोअरचा वापर करावा.
– फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याची लेन्स ओल्या कपड्याने साफ करावे.
– पूर्ण सफाई केल्यानंतरच स्मार्टफोन ऑन करावा.

हे टाळा
– फोन साफ करण्यासाठी अधीक ओल्या कपड्याचा वापर करु नये.
– फोनच्या स्किनवर थेट लिक्विड स्प्रे मारु नका कारण त्यामुळे डिस्पेला प्रोब्लेम येऊ शकतो.
– फोन ला साफ करताना धारदार वस्तूंचा वापर करु नका.
– स्वतःहून कोणतेही केमीकल वापरुन फोन साफ करु नये.

First Published on: May 25, 2018 12:41 PM
Exit mobile version