तुम्ही ATM मधून ५ हजाराहून अधिक पैसे काढताय का? तर ‘हे’ नक्की वाचा

तुम्ही ATM मधून ५ हजाराहून अधिक पैसे काढताय का? तर ‘हे’ नक्की वाचा

ATM

येत्या काही दिवसांत तुम्हाला एटीएममधून पाच हजार रुपयांहून अधिक पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. यापूर्वी पैसे काढताना काही विशिष्ट मर्यादा होत्या. मात्र आता जर तुम्हाला ५ हजाराहून अधिक पैसे काढायचे असतील तर त्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. हे तुमच्या विनामूल्य पाच व्यवहारांमध्ये समाविष्ट होणार नाही, ज्यासाठी तुम्हाला एक वेगळी रक्कम द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही एटीएममधून पाच हजाराहून अधिक पैसे काढणार तेव्हाच हे लागू होणार असल्याचे सांगितल जात आहे.

एकाच वेळी पाच हजाराहून अधिक रक्कम ATM मधून काढण्यासाठी एका ग्राहकाला २४ रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतील. सध्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करता येतात, त्यानंतर जर त्याच महिन्यात अधिक व्यवहार होत असतील तर सहाव्या व्यवहाराची किंमत २० रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार आहे. दरम्यान, आरबीआयने एटीएम शुल्क संदर्भात परिक्षण तसेच आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली आहे. याच्या आधारे आठ वर्षानंतर बँक एटीएमच्या अतिरिक्त शुल्कात बदल करू शकतात.

बहुतेक लोक येथे लहान रक्कम ATM मधून काढत असतात, त्यामुळे समितीने छोटे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून कोणतेही मूल्य स्वीकारल जाणार नाही असे सांगितले आहे. छोट्या शहरांतील ग्राहकांना इतर बँकांच्या ATM मधून दरमहा सहा वेळा पैसे काढण्यासाठी सूट मिळणार असून सध्या छोट्या शहरांमध्ये फक्त पाच वेळा पैसे काढता येऊ शकतात, असे देखील सांगितले आहे. तसेच मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या महानगरांमध्ये ग्राहकांना एका महिन्यात तीनदा एटीएममधून पैसे काढण्याची मुभा आहे, त्यानंतर चौथ्यांदा अतिरिक्त शुल्क आकारले जाते.


सावधान तुम्ही ट्रोलच्या कक्षेत आहात…!

First Published on: October 18, 2020 11:01 AM
Exit mobile version