का कमी होत आहे ‘फेसबुक’ची लोकप्रियता?

सोशल मीडिया ! झपाट्याने वाढत असलेले आणि तरूणाईसह सर्वच वयोगटामध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेले व्यासपीठ. सोशल मीडियाची वाढती क्रेझ पाहता दिवसेंदिवस अनेक अॅप बाजारात येत असतात. यातील काही पसंतीला उतरतात तर काही नाही. अशाच प्रकारे सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेली अॅप्स म्हणजे व्हॉटसअप, फेसबुक, आणि इन्स्टाग्राम ! आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात सर्वांधिक पसंती मिळत आहे इन्स्टाग्रामला ! नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीवरून ही बाब आता स्पष्ट झाली आहे. मोठ्या झपाट्याने इन्टाग्रामने १ अब्ज युजर्सचा आकडा पार केला. या आकडेवारीवरून इन्टाग्रामच्या वाढत्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. वाढती लोकप्रियता पाहता इन्स्टाग्राम देखील युजर्सना काही नवीन फिचर्स देता येतील का? यासाठी प्रयत्नशील असते. केवळ फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त होता येत असल्याने तरूणाईचा इन्स्टाग्रामकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुकच्या तुलनेत इन्स्टाग्राम युजर्सशी संख्या वाढत आहे. इन्स्टाग्रामने तशी आकडेवारी देखील जाहीर केली आहे. फेसबुकने देखील तरूणाईचा कल इन्स्टाग्रामकडे वाढत असल्याची कबुली दिली आहे.

‘फेसबुक’ची लोकप्रियता कमी होतेय?

इन्स्टाग्रामकडे तरूणाईची कल वाढत आहे. त्याचा परिणाम हा फेसबुकच्या लोकप्रियतेवर होत आहे. इन्स्टाग्रामच्या सीईओंनी देखील त्याची कबुली दिली आहे. युजर्ससाठी सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न हा इन्स्टाग्रामकड़ून होत असतो. व्हिडीओची शेअरिंगची वाढती लोकप्रियता पाहता इन्स्टग्रामने IGTV नावाचे नवीन फिचर आणण्याचा निर्णय घेतला आहे, सॅन फ्रान्सिस्को इथे झालेल्या सोहळ्यात इन्स्टाग्रामच्या सीईओंनी ही घोषणा केली. त्यासाठी कोणतेही नवीन अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्याची गरज नसणार आहे. तब्बल १ तासापर्यंत यापुढे इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करता येणार आहे. त्याचा फायदा हा साहजिकपणे इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होण्यासाठी होणार आहे. शिवाय, IGTV हे नवीन फिचर आयएसओ आणि अॅड्राईड या दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोन्सवर उपलब्ध असणार आहे.

First Published on: June 22, 2018 10:58 AM
Exit mobile version