तुम्ही इन्स्टाग्राम अपडेट केलात? ‘इन्स्टा’वर आले नवीन फिचर!!

तुम्ही इन्स्टाग्राम अपडेट केलात? ‘इन्स्टा’वर आले नवीन फिचर!!

इन्स्टाग्राम

सोशल मीडिया इतक्या वेगाने वाढतेय की प्रत्येक कंपनी आता नवीनवीन फिचर्स देण्याचा प्रयत्न करत आहेत. वाढती स्पर्धा आणि युजर्सना आकर्षित करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि स्नॅपचॅटवर नवीन फिचर्स येत आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती इन्स्टाग्रामवर येणाऱ्या नवीन फिचरची! सध्या सर्वाधिक लोकप्रिय होणाऱ्या इन्स्टाग्रामवर देखील तुम्हाला आता ग्रुप कॉलिंगची सुविधी उपलब्ध होणार आहे. फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवरच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून आता एकाच वेळी ४ जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेमुळे आणखीन भर पडणार आहे. केवळ व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करता येत असल्याने इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेमध्ये झपाट्याने वाढ झाली. शिवाय, नुकतेच इन्स्टाग्रामने १ अब्ज युजर्सचा आकडा देखील ओलांडला. त्यात आता ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची भर पडल्याने इन्स्टाग्रामच्या लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढेल यात शंका नाही.

काय आहे ग्रुप कॉलिंगची सुविधा

१- इन्स्टाग्राम अॅप उघडल्यानंतर तुम्हाला व्हिडीओ कॉलिंगचे बटन आयकॉन दिसेल.
२ – व्हिडीओ कॉलिंग बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची कॉन्टेक्ट लिस्ट तुम्हाला दिसेल.
३- ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी ४ जणांशी संपर्क साधता येणार आहे.
४ – जर तुम्हाला कुणी ब्लॉक केले तर, मात्र तुम्ही त्या व्यक्तिशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क साधू शकत नाही.
५ – व्हिडीओ कॉल सुरू असताना तुम्ही ब्राऊज करू शकता. त्यामुळे तुम्हची व्हिडीओ कॉलिंगची स्क्रीन छोटी दिसेल.
६ – व्हिडीओ कॉलिंगच्या दरम्यान तुम्ही ब्राऊज करत असाल तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय करत आहात याची कोणतीही माहिती कळणार आहे.
७ – व्हिडीओ कॉलिंग सुरू असताना तुम्हाला आणखी काही लोकांशी देखील संवाद साधता येणार आहे.

स्नॅपचॅट – इन्स्टाग्राममध्ये स्पर्धा वाढली

इन्स्टाग्रामच्या व्हिडीओ कॉलिंग फिचर्समुळे स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राममधील स्पर्धा वाढणार आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून १६ जणांशी व्हिडीओ कॉलिंग करता येते. पण लवकरची तुम्ही ३२ जणांना व्हिडीओ कॉलिंग करू शकणार आहात. पण, इन्स्टाग्रामची लोकप्रियता पाहता व्हिडीओ कॉलिंगमध्ये स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राममधील स्पर्धा वाढणार आहे. शिवाय, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देखील व्हिडीओ कॉलिंग करता येत असल्याने सोशल मीडियामधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पण, युजर्सना मात्र या फायदा होणार हे नक्की!

कॅमेरामध्ये नवीन बदल

काही नामवंत कंपन्यांशी टाय अप करत इन्स्टाग्राम कॅमेरामध्ये देखील काही नवीन फिचर्स आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्याचा फायदा देखील युजर्सना होणार आहे.

First Published on: June 27, 2018 12:16 PM
Exit mobile version