भारतीयांसाठी इन्स्टाग्राम हिंदीतही येणार

भारतीयांसाठी इन्स्टाग्राम हिंदीतही येणार

इन्स्टाग्राम

सध्याच्याघडीला तरूणाईमध्ये इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय असलेलं सोशल नेटवर्कींस अॅप आहे. २०१८ सालच्या सांख्यिकीनुसार फेसबुक भारतातील सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग साईट बनली आहे. भारतात सध्या जवळपास फेसबुकचे ३० कोटी वापरकर्ते आहेत. त्यामुळेच फेसबुक आता भारतीय वापरकर्त्यांना आवडतील असे अपडेट देत आहे. इन्स्टाग्राम हे फोटो-व्हिडिओ शेअरींग अॅप सुद्धा फेसबुकचेच. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरही भारतीय वापरकर्त्यांना आवडेल असे फिचर देण्याचा विचार फेसबुकने दिला आहे. त्यासाठीच लवकरतच हिंदी भाषेला सपोर्ट करणारे फिचर इन्स्टाग्रामवर मिळणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

काही वर्षांपूर्वी फेसबुकने व्हॉटसअॅप या संदेशवहन अॅपची मालकी स्वतःकडे घेतली होती. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर फेक न्युजशी लढण्याचे आव्हान फेसबुकसमोर आहे. हिंदी भाषिक फिचर आणून भारतातील लोकप्रियता जास्तीत जास्त वाढवण्याकडे इन्स्टाग्रामचा कल असणार आहे. इन्स्टा अॅपचे संशोधक जेन मन्चून वोंग यांनी या बदललेल्या इन्स्टाग्रामचे बिटा व्हर्जनचे काही फोटो नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये कमेंट्स, सेटिंग्ज, प्रोफाईल हे सेक्शन हिंदीमध्ये दिसत आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आधीपासूनच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. आता इन्स्टा सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी भाषेत येत आहे.

IGTV नवीन फिचर

यासोबतच इन्स्टाग्राम एक नवीन फिचर आणत आहे ज्याचे नाव IGTV आहे. आतापर्यंतचे इन्स्टाचे हे सर्वात मोठे अपडेट असल्याचे सांगितले जात आहे. या अपडेटमुळे एक तासापर्यंतचा मोठा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. हे अपडेट अँड्रॉईड आणि आयओस दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्सवर उपलब्ध होणार आहे. कोणताही युजर स्वतःचे IGTV चॅनेल इन्स्टावर बनवू शकतो. जसे फेसबुकवर पेज क्रिएट करता येते, त्याप्रमाणेच IGTV पर्याय असणार आहे. मात्र यावर फक्त व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत. एकप्रकारे हे वेब चॅनेल असल्याचे बोलले जात आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवे फिचर

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इन्स्टावर ग्रुप फिचर आणण्याचा विचार करत आहे. यामाध्यमातून एकाच कॉलेजमधले विद्यार्थी कम्युनिटी लिस्ट बनवू शकतात. या लिस्टमध्ये विद्यार्थी डायरेक्ट मेसेज आणि स्टोरी पाठवू शकतात. त्यासोबतच वर्गाच्या तुकड्याप्रमाणेही ग्रुपचे वर्गीकरण करता येणार आहे. त्यामुळे आपल्या वर्गमित्रांच्या सानिध्यात राहणे आणखी सोप्पे होणार आहे.

First Published on: November 9, 2018 4:02 PM
Exit mobile version