iPhone SE 2 भारतात लाँच, किंमत बघून बसेल सुखद धक्का

iPhone SE 2 भारतात लाँच, किंमत बघून बसेल सुखद धक्का

अॅपलने शेवटी आपल्या परवडणार्‍या iPhone SE चं अपग्रेड व्हर्जन iPhone SE 2 भारतात लाँच केला आहे. या नव्या iPhone SE 2 ला तीन स्टोरेज ऑप्शन्स ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी मध्ये लाँच करण्यात आलं आहे. हा फोन सफेद, काळ्या आणि लाल या तीन रंगात आहे. हा फोन ५ एप्रिलला लाँच केला जाणार होता. परंतु कंपनीने १५ एप्रिलला लाँच केला. हा नवीन परवडणारा iPhone SE 2 जागतिक स्तरावर बाजारात आणला गेला आहे.

डिस्प्ले

iPhone SE 2 मध्ये ४.७ इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले वापरला आहे. तसंच, यात टच आयडी सारखी सुरक्षा देण्यात आली आहे. नवीन iPhone SE 2 ची रचना मोठ्या प्रमाणात २०१७ मध्ये लॉन्च झालेल्या आयफोन ८ सारखी आहे. प्रोसेसरबद्दल बोलताना, नवीनतम ए १३ बायोनिक चिप त्यात वापरली गेली आहे. हा फोन सिंगल रियर आणि सेल्फी कॅमेरासह येतो. गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या कंपनीच्या आयफोन ११ सिरीजमध्ये ए १३ बायोनिक चिप वापरली गेली आहे. तसंच, तो आयओएस १३ वर चालतोय.


हेही वाचा – भारतात आज ‘वनप्लस ८ सीरिज’ लाँच होणार; जाणून घ्या फिचर्स


iPhone SE 2 च्या मागील बाजूस ग्लास फिनिश डिझाइन देण्यात आलं आहे. फोन IP67 वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्स आहे. हा फोन १ मीटर पाण्यात ३० मिनिटांपर्यंत राहू शकतो. त्याच्या डिस्प्लेमध्ये HDR10 प्लेबॅक सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या होम बटणावर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

नवीन iPhone SE 2 वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Qi प्रमाणपत्र फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ३० मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज होऊ शकतो. WiFi 6, ब्लूटूथ सारख्या कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. फोनमध्ये ड्युअल सिम कार्डची रचना आहे. A13 बायोनिक चिप असल्याने, वापरकर्त्यांना गेमिंग आणि मल्टी-टास्किंगचा चांगला अनुभव मिळेल.

 

First Published on: April 16, 2020 9:50 AM
Exit mobile version