आयफोन युजर्सना झटका! Appsसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

आयफोन युजर्सना झटका! Appsसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

आयफोन युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. लवकरच आयफोन युजर्सला Apps आणि इन-Apps साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, साऊथ आफ्रिका आणि रशिया या सहा देशांमध्ये Apple App स्टोअर आपला चार्ज वाढवणार आहे. Appleने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, टॅक्स वाढल्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलत आहे. दरम्यान भारतात इंटरनेट कंपनींवर १८ टक्के जीएसटी व्यतिरिक्त २ टक्के टॅक्स लावला गेला आहे.

इक्वलाइझेशन लेवी हा एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्साचा आहे. जो परदेशी टेक कंपन्यांकडून डिजिटल ट्रांजेक्शनद्वारे होणाऱ्या कमाईवर घेतला जातो. त्याचप्रमाणे इंडोनेशियाबद्दल बोलायचे झाले तर देशाबाहेरील स्थित असलेल्या डेव्हलपर्सला १० टक्के नवीन टॅक्स भरावा लागतो.

Apple ने सांगितले आहे की, जेव्हा टॅक्स किंवा फॉरेन एक्सचेंज रेटमध्ये बदल होतो, तेव्हा कधी कधी App स्टोअरवर किंमत अपडेट करेन गरजेचे असते. पुढील काही दिवसांमध्ये App स्टोअरवर Apps आणि इन-Apps खरेदीची किंमत भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, साऊथ आफ्रिका आणि रशिया मध्ये वाढेल.

कंपनीने सांगितले आहे की, नवीन किंमत जाणून घेण्यासाठी युजर्सना Apple डेव्हलपर पोर्टलच्या My Apps मध्ये Pricing and Availability सेक्शनमध्ये जावे लागले. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही आहे की, भारतात Apple ची स्वतःची सर्व्हिस जसे की,
Apple Music, Apple TV+ आणि iCloud च्या किंमतीत बदल होणार की नाही.

First Published on: October 27, 2020 11:27 PM
Exit mobile version