इंटरनेट स्पीड वाढवणारं इस्रोचं नवं यान अंतराळात झेपावणार!

इंटरनेट स्पीड वाढवणारं इस्रोचं नवं यान अंतराळात झेपावणार!

(फोटो प्रातिनिधीक आहे.)

हायस्पीड इंटरनेट काळाची गरज आहे. सध्या ४ जी चा जमाना असला तरी पुढील काळात याहून अधिक जलद इंटरनेटची गरज भासू शकते. म्हणूनच खास इंटरनेट स्पीड वाढवणारे एक यान इस्रोने तयार केले असून ३० नोव्हेंबर रोजी ते अंतराळात झेपावणार आहे. जीसॅट-११ असे या यानाचे नाव असून आता इस्रोचे हे मिशन यशस्वी करण्यासाठीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

फ्रान्समधून होणार उड्डाण

फ्रान्समधील गयाना स्पेसपोर्टहून या यानाचे उड्डाण होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी यानाचे उड्डाण होणार असून महत्त्वाची गोष्ट अशी की, या यानाचे वजन ५.७ टन किलो इतके आहे. इस्त्रो पहिल्यांदाच इतक्या जास्त वजनाचे यानन अंतराळात सोडणार आहे. ज्याचा उपयोग इंटरनेट सेवा जलद करण्यासाठी असणार आहे.

आधीचे मिशन अयशस्वी

जगभरातील माणसांचा संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी इंटरनेटची गरज असते. म्हणून इस्रोने या आधी मार्च महिन्यात जीसॅट- ६ए अंतराळात सोडले होते. इंटरनेट स्पीडसाठी हे यान अवकाशात सोडण्यात आले होते. पण अवघ्या काहीच दिवसात त्याच्याशी संपर्क सुटला आणि ते मिशन अयशस्वी ठरले. त्यामुळे मागील चुका टाळण्यासाठी इस्रोकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. यान वजनदार असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रिक सर्कीट आणि अन्य बाबींची वारंवार तपासणी केली जात आहे.

First Published on: August 6, 2018 3:05 PM
Exit mobile version