Jeep Compass Night Eagle एडिशन भारतात लाँच

Jeep Compass Night Eagle एडिशन भारतात लाँच

अमेरिकेची ऑटोमोबाइल कंपनी जीपने भारतात आपली नवीन एसयूव्ही कार जीप कंपास नाइट ईगल (Jeep Compass Night Eagle) एडिशन लाँच केलं आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत १.४ पेट्रोल व्हेरिएंटची किंमत २०.१४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. डिझेल मॅन्यूअल मॉडेल ४*२ व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत २०.७५ लाख रुपये आहे. तर ४*४ डिझेल स्वयंचलित व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत २३.३१ लाख रुपये आहे. जीप कंपासची ही जगभरातील विशेष आवृत्ती आहे जी ४ बॉडी रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. व्होकल व्हाइट, एक्सॉटिका रेड, ब्रिलियंट ब्लॅक आणि मॅग्निओ ग्रे या रंगांमध्ये ही एसयूव्ही आहे.

जीप कंपास नाईट ईगल या नावानरुन कारच्या आतील आणि बाहेरील भागावर काळ्या रंगाचा वापर केला गेला आहे. ब्लॅक आउट ग्रिल, फ्रंट बम्पर, छप्पर पॅनेल, ब्लॅक बॅजिंग, अगदी ब्लॅक विंडो लाईन्स आणि १८ इंचाच्या अलॉय चाकं देखील काळ्या रंगांची आहेत. केबिनमध्ये काळ्या टेक्नो लेदर सीट्स आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये कंपनीने Apple कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आणि Amazon Alexa सपोर्ट देण्यात आला आहे. हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि फ्रीक्वेंसी डॅम्पेड सस्पेंशन अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

जीप कंपास नाईट ईगलचं इंजिन सामान्य कंपास श्रेणीतून तयार केलेलं आहे. एसयूव्ही फक्त एका पेट्रोल व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे, १.४ लिटरचे चार सिलेंडर, मल्टी एअर टर्बो पेट्रोल इंजिन जे १६० बीएचपी पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क तयार करते. या इंजिनला ७-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन दिलं आहे. याशिवाय एसयूव्ही दोन डिझेल मॉडेल्समध्ये सादर करण्यात आल्या आहेत.

 

First Published on: July 30, 2020 11:46 PM
Exit mobile version