गुरु ग्रहावर आढळलेले ‘ते’ पाणी?

गुरु ग्रहावर आढळलेले ‘ते’ पाणी?

गुरुग्रहावरील 'रेड स्पॉट'

चंद्र आणि मंगळावर पाणी आढल्यानंतर आता आता पृथ्वीपासून जवळ असलेल्या ‘गुरु’ ग्रहावरही पाण्याचे गुणधर्म आढळले आहेत, ही माहिती स्वत: नासाने दिली आहे. त्यामुळे आता या ग्रहावरही जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरु ग्रहावरील ‘ग्रेट रेड स्पॉट’ येथे पाणी असण्याची शक्यता वर्तवली आहे. साधारण ३५० वर्षांपूर्वी या ग्रहावर मोठ वादळ येऊन गेले. त्यावेळी या भागाला ‘रेड स्पॉट’ असे नाव देण्याचत आले. या भागात पाण्यांनी भरलेले ढग असण्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

पाण्यांनी भरलेले ढग?

अॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार विज्ञानैकांनी एक मॉडेल तयार केले असून या ग्रहावर पाणी असल्याचा दावा केला आहे. ग्रेट रेड स्पॉट हा पूर्णत: ढगांनी भरलेला आहे. येथील वादळामुळे याचा अभ्यास करण्यात अनेक अडथळे येत आहे. पण शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गुरु ग्रहावर असलेल्या पाण्यामध्ये ऑक्सिजनसह कार्बन मोनॉक्साईडदेखील आहे. त्यामुळे गुरु ग्रहावर सूर्याच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन आहे.

(सौजन्य- युट्यूब नासा) 

जुनोने दिली माहिती

नासाने गुरु ग्रहाच्या अभ्यास करण्यासाठी अंतराळात ‘जुनो’ नावाचे यान पाठवले आहे. नासाचे जुनो हे स्पेसक्राफ्ट

ग्रहांवरील पाण्याचा अभ्यास करणारे नासाचे ‘जुनो’ यान (सौजन्य- NASA_)

ग्रहांवरील पाणी शोधण्याचे काम करते . ग्रहावर पाणी गॅसस्वरुपात असेल तरी या यानाच्या माध्यमातून त्याचा शोध लावता येतो. वैज्ञानिकांनी या यानाने दिलेल्या जुन्या माहितीचा अभ्यास करत गुरु ग्रहावर पाणी होण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय गुरुभोवती फेऱ्या मारणाऱ्या चंद्रावर बर्फ स्वरुपात पाणी आढळले आहे. गुरुवरील ग्रेट रेड स्पॉट म्हणेच गुरुत्वाकर्णाचे कुंड आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट खेचली जाते.त्यामुळे या ठिकाणी पाणी असू शकते. सध्या शास्त्रज्ञ या संदर्भातील अधिक अभ्यास करत असून या ग्रहावरील पाणी असण्याच्या बातमीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी आशा नासाने वर्तवली आहे.

गुरु ग्रहाचे अनन्यसाधारण महत्व

सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह म्हणून गुरुची ओळख आहे. सूर्यमालेतील अन्य ग्रहांपेक्षा त्याचे द्रव्यमान जास्त आहे. या शिवाय पौराणिक आणि धार्मिक कार्यातही गुरुचे अनन्यसाधारण महत्व आहे. आता गुरु ग्रहावरील ाा

First Published on: September 2, 2018 1:32 PM
Exit mobile version