60x डिजिटल झूम सपोर्टसह Realme X3 SuperZoom स्मार्टफोन लाँच

Realme X3 SuperZoom स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच झाला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्स आणि दोन रॅम/स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर, ड्युअल फ्रंट कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. तसंच, यात 60x झूम सपोर्टसह पेरिस्कोप कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X3 SuperZoomची किंमत 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी EUR 499 (सुमारे ४३,३०० रुपये) आहे. तथापि, 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत सध्या जाहीर केलेली नाही. हा फोन आर्क्टिक व्हाइट आणि ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. हा रियलमी युरोप साइटवर आजपासून प्रीबुकिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सध्या कंपनीने भारतात त्याच्या लाँचिंग तारखेविषयी काहीही सांगितलेलं नाही.

Realme X3 SuperZoom चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० आधारित Realme UI वर चालतो आणि त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण आणि 120Hz रीफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर 12GB LPDDR4x रॅम, 256GB आणि Adreno 640 GPU आहे.

फोटोग्राफीसाठी त्याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 64MPचा आहे. याशिवाय पेरिस्कोप लेन्ससह 8MP सेंसर देखील देण्यात आला आहे. यात 5x ऑप्टिकल झूम आणि 60x डिजिटल झूम सपोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त 8MPचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP आणि 8MP कॅमेरे देण्यात आले आहेत. Realme X3 SuperZoomमध्ये अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफीसाठी एक तारांकित मोड देखील आहे.


हेही वाचा – २५ कोटी गेमर हॅकर्सच्या निशाण्यावर, व्हायरसच्या मदतीने डेटा चोरी


या स्मार्टफोनमध्ये 4,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ब्लूटूथ v5.0, ड्युअल-बँड वाय-फाय आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट देण्यात आला आहे. येथे फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणावर एकत्रित केलं आहे.

 

First Published on: May 26, 2020 10:49 PM
Exit mobile version