Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सॅमसंग (Samsung)ने फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी एस२० एफई (Galaxy S20 FE) लाँच केला आहे. गॅलेक्सी अनपॅकड फॉर एव्हरी फॅन इव्हेंट (Galaxy Unpacked for Every Fan)मध्ये हा फोन सादर करण्यात आला होता. त्याची सुरुवातीची किंमत ६९९ डॉलर आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० फॅन एडिशन ( Samsung Galaxy S20 Fan Edition)चे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. हा फोन Samsung.comवरुन प्री-बुकिंग करता येतो. हा फोन पुढच्या महिन्यात २ ऑक्टोबरपासून निवडक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई दोन मॉडेल्स 4G आणि 5G सह येईल. त्याच्या 5G मॉडेलची किंमत ६९९ (सुमारे ५१ हजार ४०० रुपये) आहे. तर फोनच्या 4G मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही. फोन तीन स्टोरेज व्हेरिएंट 6GB+128GB, 8GB+ 128GB आणि 8GB + 256GB मध्ये येईल. तसेच सहा कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये loud Red, Cloud Orange, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Navy आणि Cloud White या सहा कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येईल. हाच फोन वायरलेस मोडसह चार्ज करता येईल.

फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफईमध्ये ६.५ इंचाचा सुपर एमोलेड इन्फिनिटीव्ह ओ डिस्प्ले आहे, जो Quad HD+ ला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले 120Hz रीफ्रेश रेटसह २०:९ ऑस्पेक्ट रेशोसह येईल. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३चे संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, फोनचा डिस्प्ले ४०७ पिक्सल डेन्सिटीसह सादर करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई 5G स्मार्टफोनमध्ये Octa-Core Qualcomm Snapdragon 865+ चिपसेट वापरण्यात आला आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई 4G मध्ये इन-हाउस चिपसेट Exynos 990 चा सपोर्ट दिला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई अँड्रॉइड १० आधारित बेस्ड One UI 2.0 वर काम करेल. दोन्ही मॉडेल्सचे फोन 8GB रॅम सपोर्टसह आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचे प्राइमरी लेंस 12MP चे असतील. त्याचा अपर्चर साइज f/1.8 असेल, जो वाइड अँगल लेंस आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS)सह येईल. तसेच १२MP अल्ट्रा-वाइड लेंस f/2.2 अपर्चर आणि १२३ डिग्री फील्ड व्ह्यूसह असतील. तर 8MP चे टेलिफोटो लेंस f/2.2 अपर्चरसह येईल. सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफईच्या कॅमेर्‍यामध्ये 30X सुपर झूम, नाईट मोड आहे. फोनचा कॅमेरा 8K व्हिडिओ कॅप्चर करता येऊ शकेल. फोनच्या फ्रंट पॅनेलवर 32MP कॅमेरा दिला असेल.

बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळेल. 25W सुपर फास्ट चार्जरच्या मदतीने फोनवर चार्ज होईल. याशिवाय फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच फोनमध्ये पॉवर शेअरचा पर्यायही देण्यात आला आहे. याचा अर्थ दुसर्‍या डिव्हाइसवर चार्ज केले जाऊ शकते.

First Published on: September 24, 2020 12:03 AM
Exit mobile version