व्हॉट्सApp, फेसबुक आणि इन्स्टाग्राम होणार एकत्र; मार्क झुकरबर्ग यांचे संकेत

व्हॉट्सApp, फेसबुक आणि इन्स्टाग्राम होणार एकत्र; मार्क झुकरबर्ग यांचे संकेत

आता 'हे' तिन्ही Application होणार एकत्र

‘सध्याचे युग हे डिजिटल युग समजले जात असून सर्वांच्याच मोबाईलवर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्यक व्यक्ती ही सोशल मीडियावर असते. सोशल मीडिया म्हणजे सध्या डोळ्यासमोर येणारे Application म्हणजे व्हॉट्सApp, फेसबुक आणि इन्स्टाग्राम. या तिन्ही Applicationद्वारे अनेकदा शेरिंग केले जाते. मात्र, हे वेगवेगळे असणारे App एकत्र होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत या तिन्ही App ना एकत्र केले जाईल, अशी माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

आतापर्यंत हे झाले बदल

हे तिन्ही APP एकत्र झाल्यानंतर युजर्स फेसबुक मेसेंजरने इन्स्टाग्रामवर मेसेज करु शकतो. तर इन्स्टाग्रामवरुन व्हॉट्सApp वर तुम्ही मेसेज करु शकता. यापूर्वी फेसबुकने व्हॉट्सApp हे इन्स्टंट मेसेज शेअरिंग Application टेकओव्हर केले होते. त्यानंतर व्हॉट्सAppमध्ये बाय फेसबुक, असे लिहून आलेले पाहायला मिळाले होते. तसेच, व्हॉट्सAppप्रमाणे आता स्टोरी या फीचर्सद्वारे स्टेटस फेसबुकवरही शेअरकरता येणे शक्य झाले आहे.

व्हॉट्सApp फ्रॉम फेसबुकद्वारे जे युजर्स नवीन रजिस्ट्रेश करतील त्यांना फेसबुकचे व्हिडिओ कॉलिंग डिव्हाईसची सुविधा उपलब्ध होईल. या डिव्हाईसमधील स्टोरी टाईम या फीचरद्वारे युजर्स फेसबुक अकाउंट नसतानाही व्हिडिओ कॉलिंग करु शकतील. त्यामुळे या तिन्ही प्लॅटफॉर्मवरील चॅट इन्स्क्रिप्शन्समध्ये तसे बदल करण्यात येणार आहेत. ते बदल हे तिन्ही Application एकत्रित झाल्यानंतर दिसणार आहेत.


हेही वाचा – Video: भाईजानने केदार जाधवला दिलं खास गिफ्ट


 

First Published on: January 10, 2020 10:27 PM
Exit mobile version