जगातील पहिला ५ जी शाओमी स्मार्टफोन

जगातील पहिला ५ जी शाओमी स्मार्टफोन

MI MIX 3 (सोजन्य - एमआय ट्वविटर)

अजूनपर्यंत बर्‍याच ठिकाणी ४ जी नेटवर्कही नीट पोहचलेलं नाही. अजूनही बर्‍याच ठिकाणी भारतात ३ जी नेटवर्कचाच वापर होतो आहे. साधारण २०२० पर्यंत ४ जी संपूर्ण भारतात पोहचेल असा अंदाज आहे. मात्र बर्‍याच मोबाईल कंपन्या आता ५जी च्या तयारीमध्ये व्यस्त झाल्या आहेत. यापैकी बर्‍याच कंपन्यांनी येत्या काही महिन्यांमध्ये बाजारामध्ये ५ जी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आता ५ जी चे फोन्स कसे असतील आणि नेटवर्क कसे असेल याची उत्सुकता लागली आहे. पुढच्या वर्षी वनप्लस कंपनीचा ५ जी बाजारात येईल अशी घोषणा याआधी करण्यात आली होती. मात्र, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बिजींगमध्ये होणार्‍या एका कार्यक्रमादरम्यान शाओमीच्या एमआय मिक्स ३/५ जी फोनच्या लाँचिंगची शक्यता आहे. असे झाल्यास, शाओमीचा हा फोन जगातील पहिला ५ जी फोन ठरणार आहे.

नक्की कसा असेल हा फोन?

कंपनीकडून सतत या फोनविषयी सोशल मीडियावरही माहिती देण्यात येत आहे. नक्की या फोनमध्ये काय फिचर्स असणार आहेत याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर या फोनमध्ये १० जीबी रॅम असेल. त्याशिवाय बेजल – लेस डिस्प्लेही असेल. याशिवाय या फोनमध्ये स्लाईड – आऊट मॅकेनिझमचा वापर करण्यात आला आहे. मात्र हा फोन भारतामध्ये नक्की कधी उपलब्ध होणार आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

कसे असतील फिचर्स?

१) फोनमध्ये ६, ८ आणि १० जीबी असे तीन पर्याय असतील
२) २४+२४ मेगापिक्सल असे ड्युअल फ्रंट कॅमेरा
३) ३६४५ एमएएच बॅटरी
४) स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर
५) सुपर व्हीओसीसी चार्जिंगची टेक्नॉलॉजी

कशी असेल किंमत?
१) ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज – साधारण ३७ हजार ५०० रूपये
२) ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज – साधारण ४० हजार ८०० रूपये
३) ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज – साधारण ४४ हजार १०० रूपये
४) ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज – साधारण ४७ हजार ४०० रूपये
दरम्यान १० जीबी फोनची किंमत अजूनही समोर आलेली नाही.

First Published on: October 26, 2018 6:25 PM
Exit mobile version