Motorola ने लाँच केला जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन; पाण्याने धुता येणार!

Motorola ने लाँच केला जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन; पाण्याने धुता येणार!

Motorola ने लाँच केला जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन; पाण्याने धुता येणार हा स्मार्टफोन!

Lenovo च्या मालकीच्या Motorola या कंपनीने एक स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन तुम्ही साबणाने धुवून सहजपणे स्वच्छ करू शकता. ऐकून आतिश्योक्ती वाटत असेल ना… पण हे खरं आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या मोटोरोलाच्या नव्या फोनचे नाव Motorola Defy असे आहे. Motorola Defy ला IP68 रेटिंग मिळाली असून हा फोन एक मिलिटरी स्टँडर्ड सर्टिफाईड फोन आहे. Motorola च्या मते, Motorola Defy हा फोन ड्युअलसील्ड हाऊसिंगसह लाँच करण्यात आला आहे, म्हणजेच हा फोन ५ फूट खोल पाण्यात ३५ मिनिटांपर्यंत राहू शकतो. याशिवाय वाळू, धूळ आणि ओलावा देखील या फोनला हानी पोहोचवू शकत नाहीत. Motorola Defy या स्मार्टफोन व्हायब्रेशन आणि ड्रॉप टेस्टमधून गेला आहे. हा फोन ६ फूटांवरून सतत खाली पडल्यानंतरही खराब होणार नाही. तुम्ही हा फोन साबण आणि सौम्य जंतुनाशक लिक्वीडने देखील धुवू शकतात, असा कंपनीचा दावा आहे.

जाणून घ्या, Motorola Defy ची किंमत

Motorola Defy ची किंमत ३२९ युरो म्हणजेच साधारण २९ हजार रुपये अशी आहे. या फोनची विक्री फक्त ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये केली जाणार असून हा फोन ब्लॅक आणि फोर्जेड ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनसह दोन वर्षांची वॉरंटी आणि सिक्योरिटी अपडेटदेखील उपलब्ध असणार आहे. कंपनीने भारतात त्याच्या उपलब्धतेबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

असे आहेत Motorola Defy चे स्पेसिफिकेशन

Motorola Defy मध्ये अँड्रॉइड १० देण्यात आला आहे. याशिवाय लवकरच अँड्रॉइड ११ चे अपडेटसुद्धा युजर्सना मिळणार आहे. फोनला ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असून याला मेमरी कार्डच्या मदतीने देखील वाढवता येणार आहे.

फोनमध्ये ५ हजार mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 20W टर्बो पॉवर चार्जला सपोर्ट देते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ व्ही ५, एनएफसी, व्हीओएलटीई आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक देखील देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राइमरी लेन्स ४८ मेगापिक्सेल तर दुसर्‍या लेन्समध्ये २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि तिसऱ्या लेन्समध्ये २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनला ८ मेगापिक्सलचा कॅमेरे देण्यात आले आहे.

 

First Published on: June 18, 2021 3:54 PM
Exit mobile version