नासाच्या ‘इनसाईट’ या यानासोबत मंगळावर उतरले १ लाख भारतीय

नासाच्या ‘इनसाईट’ या यानासोबत मंगळावर उतरले १ लाख भारतीय

नासाचे मंगळावर उतरलेले इनसाईट यान

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले नासाचे इनसाईट हे यान मंगळग्रहावर यशस्वी उतरले. हा सगळा कार्यक्रम नासाने पहिल्यांदाच संपूर्ण जगासाठी LIVE ठेवला होता. पण तुम्हाला माहित आहे का? या यानासोबत तब्बल १ लाख भारतीयांनी देखील मंगळावर पाऊल ठेवले आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल कारण आताची मंगळ मोहिम ही मानवमोहिम नव्हती हेच आपल्याला माहित होते. मग १ लाख भारतीय मंगळावर पोहोचले कसे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.

वाचा- मंगळ अभियानात नासाला येणार ‘या’ अडचणी

नासाने मागवली होती नाव

नासाने मंगळावर आपले नाव नोंदवण्यासाठी एक आवाहन केले होते. जगभरातून लोकांनी आपली नावे नासाच्या संकेतस्थळावरुन नोंदवली होती. जगभरातून या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण २ कोटी ४२ लाख ९ हजार ८०७ लोकांची नावे आली. फक्त युनायटेड स्टेटमधून ६ लाख ७६ हजार ७७३ आणि चीनमधून २ लाख ६२ हजार ७५२ इतकी नावे आली. तर भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून भारतातून १ लाख ३८हजार ८९९ इतकी नावे आली होती. या सगळ्यांची नावे आता मंगळग्रहावर राहणार आहेत. या सगळ्यांना नासाकडून एक विशेष बोर्डिंगपास देखील देण्यात आला होता.

मंगळग्रहावर जाण्यासाठी नासाने दिलेला बोर्डिंग पास

मानवी केसांचा वापर

ही नावे मंगळ ग्रहावर राहण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली तयार करण्यात आली आहे. सिलिकॉन वेफर मायक्रोचीपवर इलेक्ट्रॉन बीमचा वापर करुन त्याची अक्षरे तयार करण्यात आली. तर ही मायक्रोचीप मानवी केसांवर अशा प्रकारे अडकवण्यात आली आहे की, जेणेकरुन ही नावे मंगळग्रहावर तरंगत राहतील. या यानाच्या वरील बाजूस ही सगळी नावे अडकवण्यात आली होती.

वाचा- आता घरबसल्या घ्या ‘मंगळ’ ग्रहाचे दर्शन

रोबोटिक आर्म

‘इनसाईट’ या यानासोबत रोबोटिक आर्म्सदेखील पाठवण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे रोबोटिक आर्म पाठवला आहे. याचा उपयोग मंगळ ग्रहावर साधनसामुग्री ठेवण्यात मदत करणार आहे. पण आनंदाची बाब अशी या मोहिमेतून भारतीय मात्र मंगळग्रहावर पोहोचले हे मात्र नक्की!

First Published on: November 28, 2018 2:38 PM
Exit mobile version