बजाजने लाँच केली नवी Pulsar 180 बाईक; जाणून घ्या किंमत

बजाजने लाँच केली नवी Pulsar 180 बाईक; जाणून घ्या किंमत

बजाजने लाँच केली नवी Pulsar 180 बाईक

बजाज ऑटोने Bajaj Pulsar 180 (बजाज पल्सर 180) नवं व्हर्जन बाजारात आणलं आहे. बजाज पल्सरच्या या नवीन व्हर्जनमध्ये स्पोर्ट्स स्प्लिट सीट्स, ब्लॅक अलॉय व्हील्स, एलईडी लाईट्स आणि पाच स्पीड ट्रान्समिशन गीअर बॉक्स देण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्याची किंमत दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये १,०७,९०४ रुपये ठेवली गेली आहे. लखनौच्या शोरूममध्ये त्याची किंमत १,१०,६५६ रुपये आहे. त्याचबरोबर मुंबईबद्दल बोलायचं झालं तर पल्सर 180 ची एक्स-शोरूम किंमत १,०४,७६८ रुपये आहे.

बजाज पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) स्पेसिफिकेशन

बजाजच्या नवीन पल्सर 180 मध्ये पॉवरसाठी 180cc BSVI Complaint DTS-i FI इंजिन देण्यात आलं आहे. बजाजची नवीन बाइक 8500rpm येथे कमाल 12.5 kW (17.02 PS) आणि 6500 आरपीएम वर जास्तीत जास्त 14.52 Nm जनरेट करते. पल्सर 180 मध्ये २८० मिमी फ्रंट आणि २३० मिमी रियर डिस्क ब्रेक, ब्रॉड रीअर टाईप -१२०/८०*१७, फ्रंट आणि रियर ट्यूबलेस टायर्स आणि5-spoke wheels आहेत. बजाजच्या नवीन बाईकमध्ये एंटी-फ्रिक्शन बुश फ्रंट आणि ५ स्टेप अॅडजेस्टेबल आणि नायट्रॉक्स शॉक अ‍ॅब्सॉर्बर रीअर सस्पेंशनसह देण्यात आलं आहे जे बाईकचे अधिक चांगलं हँडलिंग प्रदान करते. बजाज पल्सर 180 मध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. बाईक ब्लॅक रेड कलरमध्ये उपलब्ध आहे. पल्सर 180 मध्ये 15 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. बाईकमध्ये स्पोर्ट स्प्लिट सीट्स, ब्लॅक अलॉय व्हील्स आणि एलईडी दिवे आहेत.


हेही  वाचा – Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर लाँच; जाणून घ्या फिचर्स


First Published on: February 24, 2021 10:25 PM
Exit mobile version