आता मेसेज फॉरवर्डिंगवर व्हॉटसअपने ठेवली ‘लिमिट’

आता मेसेज फॉरवर्डिंगवर व्हॉटसअपने ठेवली ‘लिमिट’

आता फक्त ५ जणांना फॉरवर्ड करता येणार मेसेज

खासगी चॅटींगसाठी सुरु झालेले व्हॉटसअप अगदी अल्पावधीत प्रसिद्ध झाले. यातील नवीन फिचर्समुळे एकाचवेळी अनेकांना मेसेज पाठवता येऊ लागले. पण यामुळेच अफवांचे मेसेजेस, व्हिडिओ झटपट व्हायरल होऊ लागले. अफवांचे अनेक बळी गेले त्यामुळे व्हॉटसअपने फॉरवर्डिंग मेसेजवर आता लिमिट आणली आहे. एकाचवेळी आता अनेकांना मेसेज फॉरवर्ड करण्यावर आता गदा येणार आहे.

ब्लॉगमधून दिली माहिती

काही वर्षांपूर्वी एकाचवेळी अनेकांना झटपट मेसेज पाठवण्यासाठी फॉरवर्ड मेसेजचे नवे फिचर आणले होते. पण या फिचरमुळे झालेला गोंधळ पाहता आता यावर मर्यादा आणण्यासाठी एक नवा निर्णय घेतला आहे. आता एकावेळी फक्त ५ जणांना पाठवता येणार आहे. व्हॉटसअपने क्विक फॉरवर्ड ऑप्शन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातली महिती त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल ब्लॉगमधून दिली आहे.

भारत फॉरवर्डिंगमध्ये सगळ्यात पुढे

भारतात व्हॉटसअपचा सर्वाधिक वापर होतो. मेसेज, व्हिडिओ, फोटो व्हॉटसअपवरुन काही सेकंदात व्हायरल होतात. इतर देशांच्या तुलनेत व्हॉटसअपचा वापर देशात सर्वाधिक आहे, अशी माहिती व्हॉटसअपने दिली आहे. याशिवाय मेसेज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्हॉटसअपने एंड-टू- एंड इनस्क्रिप्शनदेखील सुरु केले होते. पण फॉरवर्डिंगमुळे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

अफवांमुळे गेले होते अनेकांचे प्राण

व्हॉटसअपवरील मुल पळवणाऱ्या चोरीच्या मेसेजमुळे देशभरात अनेकांना मारहाण करण्यात आली. शिवाय अनेकांचा जीवही गेला. पण तरीही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. अखेर पोलिसांना व्हॉटसअपवर नजर ठेवणे भाग पडले. फॉरवर्डेड मेसेजची सत्यता तपासून पाहण्याचे काम पोलिसांना लागले. पण आता हे फिचर काढण्यात आले आहे.

First Published on: July 20, 2018 12:41 PM
Exit mobile version